Wednesday, October 21, 2026
Homeब्रेकिंग न्यूजतू उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गपचूप खातोस, सगळ्यांना फसवतोस; रामदास कदमांचा मनोज...

तू उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गपचूप खातोस, सगळ्यांना फसवतोस; रामदास कदमांचा मनोज जरांगेंवर घणाघात

मुंबई | Mumbai
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील राजकीय वाद आता अधिक तीव्र झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचा आरोप केल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी जरांगेंवर जोरदार टीका केली. काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना कदम यांनी जरांगेंच्या उपोषणाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले, त्यांच्यावर मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली.

बाथरूममध्ये जाऊन गपचूप खातोस, सगळ्यांना फसवतो
मनोज जरांगे तू उपोषणाला बसल्यावर बाथरुममध्ये जाऊन गपचूप खातोस, सगळ्यांना फसवतोस. शिंदे साहेब माझी विनंती आहे, लावा त्याची चौकशी. तू कोणाची बदनामी करतोयस, कोणाची सुपारी घेऊन बोलतोयस? तुझी औकात काय आहे? मराठा समाजाने तुला त्यांना न्याय देण्यासाठी पाठिंबा दिला. त्याचा तू गैरफायदा घेतो काय? ज्या गावात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु होतं, त्या गाववल्यांनी त्याला हाकलून दिले आहे, अशी घणाघाती टीका रामदास कदम यांनी केली.

- Advertisement -

तर हा समाज तुला उद्ध्वस्थ केल्याशिवाय राहणार नाही
एक गोष्ट मी आपणाला सांगतो, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना उद्ध्वस्त करायला जाल तर तर हा मराठा समाज तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला इथे आलो आहे. अरे कोण आहेस तू कोण आहेस? हा मराठ्यांचा नेता झाल्यापासून याची संपत्ती कुठे आहे, कुणाकुणाच्या नावावर आहे, कुठल्या नातेवाईकांच्या नावावर आहे, लावा चौकशी याची. एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, असे रामदास कदम यांनी म्हटले.

…तर भविष्यात बिश्नोईच्या नावाने राजकीय नेत्यांच्या हत्या होतील, राऊतांचा खळबळजनक दावा

शिंदे, कदम, भोसले हे मराठा आहेत, लाचार नाहीत तुझ्यासारखे
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस? ही मराठा समाजाची संस्कृती आहे का? समाजानं तुला समाजाला न्याय देण्यासाठी पाठिंबा दिला, त्याचा गैरफायदा घेतो का तू, ज्या गावात उपोषण होतं, त्या गावानं त्याला हाकून दिला आहे. शिंदे, कदम, भोसले हे मराठा आहेत, लाचार नाहीत तुझ्यासारखे. याद राख एकनाथ शिंदे दोन दोन हातानं देणारे आहेत, घेणारे नाहीत. सुपारी घेऊन त्यांना बदनाम करायला निघालास का? यापुढे गाठ मराठा समाजाशी आहे, शिवसैनिकांशी गाठ आहे हे सांगायला इथं आलो आहे, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्यावर एवढ्या मोठ्या रकमेचा आरोप केला जात असेल, तर त्यासंबंधी ठोस पुरावे समोर आणावेत, असे कदम यांनी म्हटले. शिंदे यांच्याविरोधातील आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचा दावा करत त्यांनी जरांगेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. शिंदे यांनी मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावल्याचा उल्लेख करून कदम यांनी त्यांचे समर्थन केले.

मनोज जरांगेंनी काय आरोप केलाय
विजयादशमीच्या दिवशी बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत गंभीर आरोप केला होता. दोन ते अडीच वर्षांपूर्वी आपल्यासंदर्भात एक कथित राजकीय कट रचण्यात आला होता, अशी माहिती काही दिवसांपूर्वी मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, भाजपमधील काही नेत्यांमध्ये आपणास ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा असल्याची माहिती त्यांना मिळाली. हे पैसे शिंदे यांनी भाजपकडून आणून आपल्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले गेले होते का, असा सवाल त्यांनी शिंदे यांना केला. या कथित व्यवहाराबाबत शिंदे यांनी सार्वजनिकरीत्या स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

ताज्या बातम्या