Sunday, May 3, 2026
Homeमहाराष्ट्रSushama Andhare: अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर होताच सुषमा अंधारेंची पोस्ट व्हायरल; म्हणाल्या,...

Sushama Andhare: अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर होताच सुषमा अंधारेंची पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, ”आमदारकी, खासदारकी…

मुंबई | Mumbai
सध्या राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपने काल रात्री आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यावेळी मोठे धक्कातंत्र वापरत ५ उमेदवारांना संधी दिली आहे. या यादीमध्ये प्रज्ञा सातव यांचेही नाव आहे. त्यानंतर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील विधानपरिषद निवडणुकांसाठी नाव जाहीर करण्यात आले. मविआचे उमेदवार म्हणून स्वत: उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेची उमेदवारी घ्यावी असा मविआ कडून आग्रह होता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करताच काँग्रेसनेही आपली भूमिका जाहीर करत आपणही या निवडणुकीत उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. या स्पर्धेत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यातच, या घोषणेनंतर सुषमा अंधारेंनी आपली भूमिका मांडली आहे.

सुषमा अंधारेंची पोस्ट
अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर होताच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. त्या म्हणतात, ”आमदारकी, खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान”, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी एकप्रकारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमवेतचा व्हिडिओ शेअर करत, उद्धव ठाकरेंशी असलेले नातेच आपल्यासाठी सर्वस्व असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमधून सूचवले आहे. उद्धव ठाकरेंना राखी बांधतानाचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी शेअर केला आहे.

- Advertisement -

अंबादास दानवे काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंनी सभागृहात जावे अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. पण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मला वाटते. निश्चित मी उद्धव ठाकरेंचा, पक्षाचा आभारी आहे. शिवसेना प्रमुखांच्या विचाराने चालण्याचा आम्ही जो संकल्प केला मला असे वाटते त्याच विचाराचा हा विजय आहे. निष्ठा तर ठेवली पाहिजे. फळ म्हणायला गेलो तर ह्याच्या आधीही मी सभागृहात होतो. विरोधी पक्ष नेता होतो. निष्ठा तर ठेवली पाहिजे. परंतू सामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंनी त्यांची जागा दिली हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

Congress: अंबादास दानवेंच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेस उमेदवार देणार, हर्षवर्धन सपकाळ दिल्लीत

तसेच, मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो. पक्षाने, शिवसेना प्रमुख्यांच्या आशिर्वादाने मला जबाबदारी दिलेली आहे. मी ऑलरेडी सभागृहात होतो. एक गॅप के बाद, एका ब्रेकनंतर पुन्हा येतोय. उद्धव ठाकरे पुन्हा सभागृहात येतील या चर्चेवर बोलताना दानवे म्हणाले की, मला असे वाटते उद्धव ठाकरेंनी एका शिवसैनिकाला सभागृहात जाण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. आमच्या सगळ्यांची भूमिका होता की त्यांनी सभागृहात यावे. मला असे वाटते उद्धव ठाकरेंनी सगळ्या नेत्यांशी चर्चा करुन उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस काय भूमिका घेणार?
शिवसेना ठाकरे पक्षाने आज उमेदवारी जाहीर केली, पण त्यासंदर्भात आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे स्वत: फॉर्म भरणार असतील, ते स्वत:ची उमेदवारी घोषित करणार असतील तर त्यांना सहकार्य करण्याची आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट होती. पण त्याव्यतिरिक्त दुसरं नाव समोर आल्यानंतर मी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा केली आहे. मी त्यांना विचारलं की, अंबादास दानवे यांच्या नावासंदर्भात तुमच्यासोबत चर्चा झाली का? पण त्यांनी सांगितलं की अशी चर्चा झालेली नाही. आता ते दिल्लीहून मुंबईत आले आहेत. मी त्यांच्यासोबत चर्चा करेल. आमच्यासोबत चर्चा न करता जे नाव समोर आलं आहे. पण उद्या राज्यसभा निवडणूक होणार आहे. त्यासंदर्भात सुद्धा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक होतं. आमची भूमिका होती की, ही जागा शिवसेना ठाकरे पक्ष लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे आणि आम्ही ती सोडणार नाही. ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आज जी उमेदवारी घोषित झाली त्यासंदर्भात प्रदेशाध्यक्षांसोबत मी चर्चा करणार आहे. त्यानंतर या निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय सांगू, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नसरापूर येथे घडलेल्या अमानुष आणि संतापजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला...