Monday, June 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजखासदारकीची भीक मागणारा, लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान…; काँग्रेसने मिलिंद देवरांना एका ट्विटवरुन...

खासदारकीची भीक मागणारा, लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान…; काँग्रेसने मिलिंद देवरांना एका ट्विटवरुन सुनावले

मुंबई | Mumbai
ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर सायंकाळी 5 वाजता मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत दाखल होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वाद उफाळून आला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी केलेल्या ट्विटला काँग्रेसला उद्देशून असल्याचे समजून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना ठरतो, अशा शब्दात महाराष्ट्र काँग्रेसने देवरा यांच्या ट्विटला प्रत्त्युत्तर दिलेय.

- Advertisement -

Bihar New CM: बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता येणार; सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, तर निशांत कुमार उपमुख्यमंत्रीपदाची

काय आहे नेमके ट्विट
आशा भोसले यांच्या अंत्यसंस्कारासाठी आज मुंबईत उपस्थित राहिलो. सर्वच स्तरांतील लोकांनी एकत्र येत प्रेम, संगीत आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत त्यांना अखेरचा निरोप दिला. प्रत्येक राजकीय पक्षाने या दु:खद प्रसंगी वरिष्ठ प्रतिनिधित्व सुनिश्चित केले होते. मात्र, एक अपवाद ठळकपणे दिसला, जो देशाच्या सांस्कृतिक स्पंदनापासून त्यांचा तुटलेपणा दर्शवतो, असे ट्विट मिलिंद देवरा यांनी केले होते. आता, त्यांच्या या ट्विटला काँग्रेसला उत्तर दिलेय.

काँग्रेसने काय प्रत्युत्तर दिले
लाचारी, मुर्खपणा आणि अज्ञान यालाही काही सीमा असते म्हणतात, पण मिलिंद देवरांनी ही सीमा कधीच ओलांडली आहे. मिलिंद देवरांच्या वडिलांचे सहकारी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान, खासदार प्रणिती शिंदे आणि प्रदेश काँग्रेसचे अनेक जबाबदार पदाधिका-यांनी स्वतः जाऊन आशाताई भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. ही आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, आणि माणुसकी आहे.

पण दुसरीकडे, शिंदे गटाच्या दारात उभं राहून खासदारकीची भीक मागणारा आणि ती मिळाल्यावर उपकार फेडण्यासाठी खोटे बोलून काँग्रेसवर चिखलफेक करून शिंदेंचे उपकार फेडण्याचा प्रयत्न करणारा गद्दार मिलिंद देवरा हा राजकारणातील सर्वात खालच्या पातळीचा नमुना ठरतो, अशा शब्दात काँग्रेसने ट्विटरवरुन मिलिंद देवरा यांना सुनावले.

ज्या काँग्रेसने तुमच्या घराण्याला नाव, मान, ओळख आणि सत्तेची दारं उघडून दिली, त्याच काँग्रेसवर उगाचच भुंकत फिरणं ही कृतघ्नतेची परिसीमा नाही तर काय? मिलिंद देवरांनी आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा आणि मग काँग्रेसवर बोलावं. लाचारीतही एक मर्यादा असते, पण ती ओलांडून निर्लज्जपणाचा नवा विक्रम करण्याचं काम सध्या ते प्रामाणिकपणे करत आहेत, असेही काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे.

कालचे ट्विट एका पक्षासाठी केले होते, पण ते दुसऱ्याच पक्षासाठी आत्मघात, गोंधळ आणि नकळत कबुली देणारे ठरल्याचे पाहून आनंद झाला. “जेव्हा तुमचा शत्रू चूक करत असतो, तेव्हा त्याला कधीही थांबवू नका”, असे नेपोलियन बोनापार्ट यांनी म्हटल्याचा दाखलाही मिलिंद देवरा यांनी दिला. दरम्यान, आपले ट्विट हे ठाकरेंच्या शिवसेना पक्षासाठी होते असेच त्यांनी सूचवले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...