नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. नीट परिक्षेतील गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरुन दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. आंदोलकांवर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला आहे. तर दिल्लीतील मेट्रो स्थानके बंद करण्यात आली आहे. या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
५६ इंच वाल्यांची हातभर
खासदार संजय राऊत यांनी आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जनंतर एक्स अकाऊंटवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सरकार पोरांना घाबरलेय! शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभर फा#$. डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली; शक्य असते तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ED लावली असती. पण ते कठीण आहे. मोर्चाचा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा. Ed, सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी, शाहांच्या गुलाम झाल्या आहेत,” अशी टीका त्यांनी केलीय.
यापूर्वी सकाळी माध्यमांशी संवाद साधतानाही राऊतांनी याच मुद्यावरून सरकारवर टीका केली होती. हे सरकार मुलांना पूर्णपणे घाबरले आहे. सरकारला वाटल ह्यांना किड्या, मुंग्यासारख चिरडणार. पण हे झुरळ फार खंबीर आहे अनेक ठिकाणी त्यांना समर्थन मिळतेय, असे राऊत म्हणाले होते. एवढेच नव्हे तर सर्व न्यायालय हे, प्रधानमंत्री आणि गुहमंत्री ह्यांचे गुलाम आहे. प्रत्येक पार्टीला भाजपाने खरेदी केले आहे. कोट्यावधी रुपयांत खरेदी केले आहे, असा घणाघाती आरोपही राऊत यांनी केलाय.
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली आज, २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि सेवा तीर्थ ही महत्त्वाची ५ मेट्रो स्टेशन प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद केली आहेत.




