मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्याकडून तक्रार करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात माझगाव सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड अशी शिक्षाही ठोठावण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! संजय राऊतांना मोठा झटका; ‘या’ खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा
दंडाधिकारी कोर्टाकडून (Magistrate’s Court) संजय राऊतांना सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात अपील करण्यासाठी शिक्षेला (Punishment) ३० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. कोर्टाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता राऊतांना दिलेल्या मुदतीत शिक्षेच्या निकालाविरोधात दाद मागावी लागणार आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण
शिक्षेच्या निकालावर राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले की, सगळं ऑन रेकॉर्ड आहे. मी केवळ काही प्रश्न उपस्थित केले होते. कथित भ्रष्टाचारावर विधानसभेत चर्चा झालली होती. आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहित चौकशीची मागणी केली होती. मीरा-भाईंदर महापालिकेचा अहवाल होता. मला १५ वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी सत्य बोलणं थांबवणार नाही. जनतेच्या पैशाचा अपहार होत आहे, त्यावर आम्ही काही बोलायचे नाही का? आमदार, खासदार, महापालिका सगळ्यांनी तक्रारी केल्या, पण फासावर संजय राऊतांना लटकवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
हे देखील वाचा : Nashik Accident News : नांदगाव-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, ४ जखमी
नेमकं प्रकरण काय आहे?
संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता.राऊत यांनी १२ एप्रिल २०२२ रोजी सामना वर्तमानपत्रातील लेखात लिहिले होते की, मेधा सोमय्या यांनी राजकीय ताकदीचा वापर केला. तसेच मीरा-भाईंदर परिसरातील १५४ पैकी १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट घेतले. या कंत्राटाचा वापर करून मेधा सोमय्या यांनी ३ कोटी ९० लाखांचा घोटाळ्याचा आरोप केल्याचे म्हटले होते. त्यावर मेधा सोमय्या यांनी माझगाव न्यायालयात मानहानीचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता या खटल्यात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा