मुंबई | Mumbai
काल रात्री उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील (Thane) सभेवेळी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर नारळ, शेण आणि बांगड्या फेकल्या. या राड्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर (Raj Thackeray) जोरदार हल्लाबोल केला.
हे देखील वाचा : ठाण्यात गडकरी रंगायतन बाहेर उबाठा-मनसे कार्यकर्ते समोरासमोर
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की,”दिल्लीतील अहमदशाह अब्दाली याच्या सुपाऱ्या घेतलेल्या लोकांनी काल ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताफ्यावर हल्ला केला. बीडमध्ये मनसे प्रमुखांच्याबाबत जो प्रकार झाला त्याचा शिवसेना पक्षाशी संबंध नव्हता, शिवसेना म्हणून ती भूमिका नव्हती. पण काल ॲक्शनला रिएक्शन करण्याचा प्रयत्न झाला असेल तर माझी त्यांना हात जोडून विनंती आहे पक्षातर्फे की, तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकला असेल म्हणून तुम्ही वाचला. मर्दांची अवलाद असता तर समोर येऊन केलं असते”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हे देखील वाचा : अजित पवारांचा जनसन्मान यात्रेतून महिलांना शब्द; म्हणाले, “तुमच्या विश्वासाला…”
पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्यावरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना माहिती होती. त्यांनी डरपोकांप्रमाणे काळोखात लपून नारळ आणि शेण फेकले, नशीब त्यांचं काल ते आमच्यासमोर आले नाहीत. अन्यथा त्यांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र काय आहे, ते दाखवून दिले असते. त्यामुळे आता माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की, पुन्हा असे कृत्य काळोखात अंधारात, लपून, लांबून, फेकाफेकीचे कृत्य करू नका तुमच्या घरात तुमच्या आई-वडील, मुलबाळं वाट पाहतात. अहमद शहा अब्दाली सुपारी देऊन मजा बघत आहे. महाराष्ट्रात असा गोंधळ निर्माण करण्यासाठी तीन मोठ्या नेत्यांना सुपारी दिली आहे. ज्या कशा वाजवल्या जातात, हे आपण कालं पाहिले”, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला.
हे देखील वाचा : ठाकरेंनी घेतली आफ्रिकेत घोटाळा करणाऱ्यांची भेट; शिंदेंच्या खासदाराचे गंभीर आरोप
तसेच “महाराष्ट्रात (Maharashtra) गोंधळ करण्यासाठी काही लोकांना दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीने सुपारी दिली होती.ती सुपारी ठाण्यात वाजली. अहमदशहा अब्दाली सुपाऱ्या देऊन दिल्लीतून महाराष्ट्रात सुरु असणाऱ्या गोंधळाची मजा पाहत बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात असे प्रकार घडणारच. मी इकडे कोणत्याही पक्षाचं नाव घेत नाही. कारण जे काही सुरु आहे ते दिल्लीतून अहमदशाह अब्दालीने दिलेल्या सुपारीवरुन चालू आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना काही कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. त्यानुसार हे नेते काम करत आहेत”, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा