Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे - शिंदे एकत्र येण्यावर संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले...

ठाकरे – शिंदे एकत्र येण्यावर संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई । Mumbai

राज्यातील महाविकास आघाडी सरकार (MahaVikas Aghadi Government) कोसळल्यानंतर भाजपच्या (BJP) पाठींब्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून शिवसेना खासदार ((Shiv Sena MP) संजय राऊत (Sanjay Raut) नव्या सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेनेत झालेल्या मोठया बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. खासकरुन शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyed) यांच्या ट्वीटनंतर ही चर्चा जास्तच जोरात होऊ लागली आहे. यावर आता खुद्द खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे…

- Advertisement -

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, दिपाली सय्यद या अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही. अशा प्रकारची वक्तव्य खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेले आहे. तर एकत्र यावे असे का वाटणार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यासोबतच राऊत यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर (Shinde – Fadnavis government) निशाणा साधत हे सरकार बेकायदेशीर असल्याचेही म्हटले आहे. मला भविष्यात होणाऱ्या दुर्घटनाही माहिती आहेत. घटनेला नैतिकतेचा आधार आहे. हे सरकार नैतिकतेच्या पायावर उभा आहे का? हे सरकार घटनेनुसार शपथ घेऊ शकते का? तसे असेल तर मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही? त्याचे उत्तर महाराष्ट्राला (Maharashtra) मिळायला हवे. ४० आमदारांपैकी अनेक आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी सुरू आहे. अशा वेळेला शपथ घेतल्यास सरकार कोसळेल, असेही राऊत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या