Friday, July 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRajabhau Waje: कोट्यावधी रुपयांच्या ऑफर्सला नाकारलं; खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशकात जंगी...

Rajabhau Waje: कोट्यावधी रुपयांच्या ऑफर्सला नाकारलं; खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाशकात जंगी स्वागत

नाशिक रोड | प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटासोबत एकनिष्ठ राहिलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांचे आज सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले.

दोन दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली या फुटीमध्ये राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटले. सदर खासदारांनी वेगळा गट स्थापन करून खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे, मात्र या सर्वांमध्ये नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यावधी रुपयांच्या सर्व ऑफर्स नाकारून शिवसेना ठाकरे गटातच एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खासदार राजाभाऊ वाजे यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

याच पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांचे दिल्लीहून आज सकाळी राजधानी एक्सप्रेसने नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी खासदार भास्कर भगरे, शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, नेते वसंत गिते, जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी, नगरसेवक केशव पोरजे, योगेश गाडेकर, संजीवनी हंडोरे, वैशाली दाणी, भारती ताजनपुरे, चंदू महानुभव, मंगला आढाव, योगेश भोर, योगिता गायकवाड, किरण डहाळे, व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय : १९ जून २०२६ – सत्ता संघर्षाचा अंक दुसरा!

राजभाऊ वाजेंना कोट्यावधी रुपयांची ऑफर
या संपूर्ण फोडाफोडीच्या राजकारणात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनाही ठाकरे गटातून फोडण्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, प्रत्येक खासदाराला १५ कोटींचे टोकन आणि १०० कोटींच्या विकासकामांची ऑफर दिली गेली होती.

पत्रकार परिषदेत झाले होते भावूक
दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत जेव्हा शिवसेना, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचे नाते सांगत होते आणि राजाभाऊंच्या निष्ठेचे कौतुक करत होते, तेव्हा राजाभाऊ वाजे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. पक्षावर आणि नेत्यावर ओढवलेल्या या परिस्थितीमुळे राजाभाऊ भावूक झाले आणि कॅमेऱ्यासमोरच त्यांनी दोनदा डोळ्यांतील अश्रू पुसल्याचे पाहायला मिळाले होते.

ताज्या बातम्या

Paper Leak Law : 10 कोटींचा दंड अन् 10 वर्षांची जेल;...

0
दिल्ली । Delhi देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थी, पालक आणि विविध संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे....