Wednesday, April 2, 2025
Homeनगरशिवसेनेच्या सारिका भूतकर यांचे नगरसेवकपद रद्द

शिवसेनेच्या सारिका भूतकर यांचे नगरसेवकपद रद्द

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग सहा अ मधील शिवसेनेच्या नगरसेविका सारिका भूतकर यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. त्यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने फेटाळल्याने त्यांच्या पदावर गदा आली आहे.

प्रभाग क्रमांक सहा महापौर बाबासाहेब वाकळे यांचा प्रभाग आहे. या प्रभागात महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत चारपैकी तीन जागा भाजपला तर एकमेव जागा शिवसेनेला भूतकर यांच्या रूपाने मिळाली होती. विशेष म्हणजे महापौरपदाच्या निवडीत भूतकर यांनी गैरहजर रहात अप्रत्यक्षरित्या वाकळे यांना मदत केली होती. अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गातून त्यांनी निवडणूक लढविली होती.

- Advertisement -

त्यांची ही दुसरी टर्म होती. मागील महापालिकेत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र त्यांनी सादर केले होते. मात्र जातपडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्दबातल ठरविले. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. महापालिकेत शिवसेनेचे 24 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी भूतकर यांचे पद रद्द झाल्याने आता ही संख्या 23 वर आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ०२ एप्रिल २०२५ – कचरा व्यवस्थापन अत्यावश्यकच

0
घनकचरा व्यवस्थापन हा चिंतेचा आणि वादविवादाचा विषय बनला आहे. त्यावर ‘कॅग’च्या अहवालानेही शिक्कामोर्तब केले आहे. घनकचरा व्यवस्थापनात स्थानिक स्वराज्य संस्था अपयशी ठरल्याचा ठपका कॅगने...