Thursday, September 19, 2024
Homeराजकीय"एकनाथ शिंदे हे सर्वात लोचट मुख्यमंत्री"; संजय राऊतांची घणाघाती टीका

“एकनाथ शिंदे हे सर्वात लोचट मुख्यमंत्री”; संजय राऊतांची घणाघाती टीका

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली असून महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांत दौरे सुरु आहेत. या दौऱ्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना पाहायला मिळत आहे. अशातच आता या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारला लाडकी बहीण आठवली. त्यापूर्वी फुटलेले लाडके आमदार, फुटलेले लाडके खासदार या पलीकडे यांचे लाडके कोणी नव्हते, असे म्हणत ‘मुख्यमंत्री लोचट मजनू आहेत’ अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.

हे देखील वाचा : नाशिक कृउबा समितीच्या उपसभापतीपदी माळेकर बिनविरोध

यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात (Maharashtra) सावत्र भाऊ कोणीही नाही. जे सावत्र भाऊ असतील ते दिल्लीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे महाराष्ट्राला सावत्र वागणूक देत आहेत. महाराष्ट्राचे सावत्र भाऊ नाही तर ते भाऊच नाहीत. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्राचे नुकसान केलं आहे. त्यांनी जेवढं नुकसान केलं तेवढं गेल्या १०० वर्षात कोणीही केलं नाही. आताचे मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहेत. दिल्लीच्या दारातील एवढे लोचट मुख्यमंत्री आम्ही आजपर्यंत पाहिले नाहीत. याआधी दिल्लीपुढे झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले. मात्र, यांच्याएवढा दिल्लीपुढे झुकणारा मुख्यमंत्री पाहिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज जे बोलत आहेत ते दिल्लीचे पोपट म्हणून बोलत आहेत. पण ज्या दिवशी यांची सत्ता जाईल, त्या दिवशी त्यांना दिल्ली पायापाशीही उभं करणार नाही”, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केला.

हे देखील वाचा : दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा दबाव होता…; अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रोहित पवारांची पोस्ट व्हायरल

पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, “राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) लोकसभेला (Loksabha) चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे आता आमची विधानसभेची तयारी सुरु आहे. काल बुलढाण्यात होतो, आज अकोल्यात आहे. या राज्यातील वातावरण असं आहे की कोणत्याही परिस्थितीत राज्यात सत्ताबदल होईल. हे सरकार सध्या राज्याच्या तिजोरीमधून किती उधळपट्टी करत आहे? लाडक्या बहि‍णींना पैसे मिळाले पाहिजेत. त्यांचा १५०० रुपयांचा आकडा आहे. मात्र, पुढे जर आमचे सरकार आले तर त्यामध्ये भरघोस वाढ करण्यात येईल”, असेही संजय राऊतांनी सांगितले.

हे देखील वाचा : Nashik Crime News : सराईत गग्गा अटकेत; गावठी कट्टा, काडतुस हस्तगत

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सरकारला लाडकी बहीण आठवली

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यातील महायुती सरकारला लाडक्या बहि‍णींची आठवण झाली. मात्र, तोपर्यंत फक्त फुटलेले लाडके आमदार आणि फुटलेले लाडके खासदार या पलिकडे यांचं लाडकं कोणीही नव्हतं.एका-एका आमदाराला ५०-५० कोटी आणि एका-एका खासदाराला १०० कोटी देण्यात आले. ठाकरे गटाचे पदाधिकारी फोडण्यासाठी आताही कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. पण लाडक्या बहि‍णींसाठी १५०० रुपये देण्यात येत आहेत. यावरही चर्चा होईल. निवडणुकीनंतर नोव्हेंबरमध्ये राज्यात सत्तातर झालेलं दिसेल. त्यासाठी महाविकास आघाडी मजबूतीने काम करत आहे. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र आहेत. पैसा आणि सत्ता यापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

हे देखील वाचा : संपादकीय : १४ ऑगस्ट २०२४ – संघर्षातून यशाकडे…

आमच्या नितीन देशमुखांना सातत्याने त्रास दिला जातोय

आमच्या पक्षाचे आमदार नितीन देशमुखांना सातत्याने त्रास दिला जात आहे. हा त्रास का दिला जात आहे? तर बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला जात आहे. मग तुमचं काय चाललंय? आमचे आमदार असतील, किंवा आमचे पदाधिकारी असतील आमच्या चौकशा तुम्ही करता का? मात्र, जेव्हा तुमची चौकशी आम्ही करू, तेव्हा तुम्ही सुटणार नाहीत, एवढंच सांगतो, असा इशाराही यावेळी खासदार संजय राऊत यांनी दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या