Tuesday, March 25, 2025
Homeराजकीयएकनाथ शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे अन् अमित शाहांना भेटायचे; संजय राऊतांचा...

एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशामध्ये दिल्लीला जायचे अन् अमित शाहांना भेटायचे; संजय राऊतांचा दावा

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता शिवसेना (ठाकरे गट) (Shivsena UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे वेश बदलून दिल्लीत जायचे. ते मौलवीच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायचे, असा खळबजनक दावा राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे वेशांतर करून विमानतळावर (Airport) जातात त्यांना कुणी रोखत नाही. याचा अर्थ त्यांनी नाव बदलून, बनावट पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड ओळखपत्रे बनवली आहेत. ओळपत्राशिवाय विमानतळावर कोणीही सोडत नाही. या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणे गरजेचे आहे. त्यासोबत त्यांनी जी बनावट ओळखपत्रे वापरून प्रवास केला ती सर्व जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत त्यांची चौकशी झाली पाहिजे. यातून अतिरेकी आणि दहशतवाद्यांनाच प्रेरणा दिली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

हे ही वाचा : शिंदे गटाचा श्रीरामपूर, नेवासा मतदारसंघांवर डोळा

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा-जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते. एकनाथ शिंदे हे नाव बदलून मौलवीच्या वेशात दिल्लीला गेले असल्याची माहिती माझ्याकडे आहे. एकनाथ शिंदे वेगवेगळ्या विमानतळावरून जेव्हा-जेव्हा दिल्लीला गेले, तेव्हा-तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेले होते. त्यांना दाढी आहेच. नाव बदलून ते मौलवीच्या वेशात दिल्लीला गेल्याची माझ्याकडे माहिती माझ्याकडे आली आहे. त्यांना मौलवीचा वेश शोभतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हे ही वाचा : शपथविधीवेळी नार्वेकरांकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख; तर गवळी यांची ‘जय…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...