Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रShivsena Dasara Melava : यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिंदेंच्या शिवसेनेची...

Shivsena Dasara Melava : यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिंदेंच्या शिवसेनेची माघार, केसरकरांनी सांगितलं कारण

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा (Uddhav Thackeray’s ShivSena) दसरा मेळावा (Dasara Melava) यंदा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणार कि नाही? याबाबत राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. शिवाजी पार्कसाठी शिंदेंच्या शिवसेनेने आणि ठाकरे गटाने आग्रह धरला होता. पण आता या वादावर पडदा पडला असून शिंदेंच्या शिवसेनेने माघार घेतल्यामुळे यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे…

- Advertisement -

गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही दसरा मेळाव्यासाठी आपल्याला मैदान मिळावे यासाठी ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावाही दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर यंदा कोणाचा दसरा मेळावा पार पडणार, असा पेच निर्माण झाला होता. पण, आता हा पेच सुटला आहे.

तर यंदा शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याने शिंदेंच्या शिवसेनेने दसरा मेळाव्यासाठी क्रॉस मैदान किंवा ओव्हल मैदानाची चाचपणी सुरू केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी बोलतांना केसरकर म्हणाले की, “आमचा दसरा मेळावा क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर होणार आहे. आम्हाला कुणाशीही भांडायचे नाही. त्यांना सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे. बाळासाहेबांच्या विचारांपासून ते दूर गेले आहेत. हिंदुत्वाबाबत कुणीही काहीही बोलले तरी ते शांत बसताना दिसत आहेत,’ अशी टीका केसरकरांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या