Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअंबादास दानवेंचा फोडला कॅश बॉम्ब; हे आमदार कोण आहेत पैशांच्या गड्ड्यांसह? व्हिडीओ...

अंबादास दानवेंचा फोडला कॅश बॉम्ब; हे आमदार कोण आहेत पैशांच्या गड्ड्यांसह? व्हिडीओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांना सवाल

छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
नागपूरमध्ये कालच विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आजचा दुसरा दिवस उजाडताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ बॉम्ब फोडला आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करत आहेत? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर तीन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत एक व्यक्ती पैशांचे बंडल हाताळताना दिसत आहे. कोट्यवधी रुपयांच्या पैशांचा हा व्हिडीओ दानवे यांनी पोस्ट केला आहे. तर या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शेतकरी कर्जमाफीला पैसे नाही, बाकी सगळं ओक्के आहे!
शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. अधिवेशनाच्या दुसऱ्यांच दिवशी अंबादास दानवे यांनी अशाप्रकारे कॅश बॉम्ब टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाने आजचा अधिवेशनाचा दिवस गाजण्याची शक्यता आहे. या व्हिडीओच्या आधारे विरोधक सरकारला घेरू शकतात.

- Advertisement -

दानवे काय म्हणाले?
याबाबत अंबादास दानवे म्हणाले, सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. मोठ्या नोटांच्या बंडल त्यात दिसून येत आहेत. कोणाच्या आहेत, काय आहेत हे तपासले पाहिजे. मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कोणाचे नाव घेत नाही पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

YouTube video player

आमदार महेंद्र दळीवींनी फेटाळले आरोप
अंबादास दानवेंनी तीन व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर व्हिडीओत दिसणारे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “अंबादास दानवेंनी याबाबत स्पष्टोक्ती द्यावी, त्यानंतर मी प्रतिक्रिया देईन. असे कुणाला तरी ब्लॅकमेल करणे, उचित नाहीये. आता अंबादासला कुठले काम उरले नाही. तो होपलेस माणूस आहे. त्याला कुठलंही ज्ञान नाही, असे माझे व्यक्तिगत मत आहे. असे काही असेल तर त्यांनी ओपन चॅलेंज द्यावे. त्यांनी तो संपूर्ण व्हिडीओ दाखवावा, असे काहीतरी करून कुणाला तरी ब्लॅकमेल करणे त्यांना शोभत नाही. अंबादास दानवेंची लायकी काय आहे, सर्वांना माहीत आहे.” अशा शब्दात दळवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दळवी पुढे म्हणाले की, दानवेंनी संपूर्ण व्हिडीओ दाखवावा, मग लोकांना तरी कळेल. असे ब्लॅकमेल करणे ठीक नाही. माझे ओपन चॅलेंज आहे, त्यांनी या सगळ्या गोष्टी घेऊन कोणत्याही चॅनेलवर डिबेटला यावे, माझी तयारी आहे, त्यांनी केवळ माझा फोटो दाखवला आहे. पैसे मोजणारी व्यक्ती कोण आहे, हे त्यांनी दाखवली नाही, त्यांनी ती दाखवावी, ते इतरांना हलक्यात घेतात, आम्हाला घेऊ नये.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Imtiaz Jaleel : छत्रपती संभाजीनगरचे वातावरण तापले! इम्तियाज जलील यांच्या गाडीवर...

0
छत्रपती संभाजीनगर । Chhatrapati Sambhajinagar महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला असतानाच शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयएमचे (MIM) प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज...