Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSanjay Raut: तोंडाला मास्क, चालताना त्रास…संजय राऊतांच्या जिद्दीला सलाम! बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर

Sanjay Raut: तोंडाला मास्क, चालताना त्रास…संजय राऊतांच्या जिद्दीला सलाम! बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी शिवतीर्थावर

मुंबई | Mumbai
गंभीर आजारामुळे मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले. शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले. संजय राऊत यांनी 31 ऑक्टोबरपासून घराबाहेर पडणे पूर्णपणे बंद केले होते. मात्र, आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतीदिन असल्याने त्यांना राहावले नाही आणि ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना गंभीर आजाराने ग्रासले असून त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर ते रुग्णालयातून घरी आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरातून बाहेर पडले नव्हते. मात्र, सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी संजय राऊत कोणतीही तमा न बाळगता घराबाहेर पडले आणि दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.

- Advertisement -

आज सकाळपासून शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी झाली होती. अशातच सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत हे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत उपस्थित होते. संजय राऊत हे आल्याचे समजताच शिवसैनिकांनी त्यांना अभिवादन करत त्यांच्या जिद्दीला सलाम केला. तर, राऊत यांनी देखील हात उंचावत त्यांचे अभिवादन स्वीकारले.

YouTube video player

तोंडावर मास्क
यावेळी त्यांनी तोंडावर मास्क घातला होता. अंगात शर्ट-पँट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि लाडक्या साहेबांचे दर्शन घेतले. मात्र, त्यांना चालताना त्रास होत असल्याचे दिसून आले.

ट्विट करत बाळासाहे ठाकरेंना अभिवादन
संजय राऊत यांनी आज सकाळी ट्वीट करत बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनी अभिवादन केले. ज्यांच्यामुळे मी घडलो, असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! असे संजय राऊत यांनी म्हटले. मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली ठरेल असेही राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...