Friday, November 22, 2024
Homeराजकीय"भुजबळ राजकारणातील फिरता रंगमंच, तर पवारसाहेब…"; संजय राऊतांचा निशाणा

“भुजबळ राजकारणातील फिरता रंगमंच, तर पवारसाहेब…”; संजय राऊतांचा निशाणा

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार यांच्यावर बारामतीमध्ये जोरदार टीका केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीत भुजबळांनी राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून सुरु असलेला वाद सोडविण्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता याबाबत माध्यमांशी बोलतांना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत भुजबळांना टोला लगावला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेसाठी मुंबईतील ‘या’ २५ जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी

यावेळी बोलतांना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, “छगन भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे. खूपवेळा आपले रंग रुप बदलून नाट्य निर्मिती करण्यात ते तरबेज आहेत. भुजबळ अचानक शरद पवारांकडे कसे गेले? त्यानंतर राज्याच्या राजकारणात हंगामा झाला, हे सर्वांना माहीत आहेच. पण शरद पवार सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे पुढे काय होईल, हे सर्वांनी पाहावे. महाराष्ट्रात एक फिरता रंगमंच होता. छगन भुजबळ सारखे लोक याच फिरता रंगमंचाचे कलाकार आहेत. ते इकडून तिकडे फिरत असतात”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल

तसेच मविआच्या विधानसभेच्या (Vidhansabha) जागावाटपाबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडीतील तीनही पक्ष २८८ जागांची चाचपणी करत आहे.तीनही पक्षांचा २८८ जागांचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही एकत्र बसून जागावाटपात कुणी कुठे लढायचे? हे ठरविणार आहोत. जो जिंकू शकेल, त्यालाच तो मतदारसंघ मिळेल हे आमचे सूत्र आहे असे संजय राऊत म्हणाले. तसेच आमचा जागावाटपाचा कोणताही फॉर्मुला ठरलेला नसून ही चुकीची माहिती आहे,” असेही त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : IAS वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला अटक

लाडक्या बहिणीलाही दहा हजार द्या

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने नवनव्या योजना आणण्यास सुरुवात केली आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, छोटा भाऊ, मोठा भाऊ हे सर्व आता त्यांना आठवायला लागले आहे. विरोधकांनी या योजनांवर टीका केलेली नाही. सरकारी पैशांचे वाटप आणि त्यामाध्यमातून निवडणुकीचे जे राजकारण सुरू आहे, त्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत,असे राऊत यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज असल्याचे म्हणत राऊतांनी ‘लाडक्या बहिणीला १० हजार देण्यात यावे’, अशी मागणीही त्यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या