मुंबई | Mumbai
आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. यात मविआमधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना व शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जागावाटपासंदर्भात एक बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील ३६ पैकी किमान २५ जागा लढण्याची रणनीती आखल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरेंची शिवसेना मुंबईमधील शिवडी, भायखळा, वरळी, माहीम, चेंबूर, भांडुप पश्चिम, विक्रोळी, मागाठाणे, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी,अंधेरी पूर्व, कुर्ला, कलिना, दहिसर, गोरेगाव,वर्सोवा,वांद्रे पूर्व, विलेपार्ले, कुलाबा, वडाळा, चांदीवली, बोरिवली, मलबार हील, अणुशक्ती नगर आणि मानखुर्द शिवाजीनगर या २५ विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढण्याची तयारी केली असल्याचे सांगितले जात आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : १८ जुलै २०२४ – मेहनतीचे फळ
यामधील वांद्रे पूर्वमधून युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवतांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत (NCP and Congress) काही जागांमध्ये अदलाबदल केली जाण्याची शक्यता असून याचा निर्णय मविआच्या बैठकांमध्ये वरिष्ठ पातळीवर होणार असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल
दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) मुंबईतील ३६ पैकी १४ जागा जिंकल्या होत्या. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यातील आठ आमदार (MLA) ठाकरेंसोबत आहेत. तर सहा आमदार शिंदेंच्यासोबत आहेत. त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक मताधिक्य मिळाले आहे, अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा