Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाली आहेत. म्युझियमसोबत झालेल्या करारानुसार वाघनखे बुधवारी मुंबईत आणण्यात आली. येथून ती सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. यानिमित्त १९ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विशेष सोहळा पार पडणार आहे.

हे देखील वाचा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटले अन्…

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या मोघल सरदार अफझल खान याचा वाघनखांनी (Waghnakh) कोथळा बाहेर काढला होता. सध्या लंडनमध्ये असलेली ही वाघनखे राज्यात आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी तेथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर ही वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्याबाबतचा करार करण्यात आला.

हे देखील वाचा : विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटलांचा पराभव कसा झाला? भुजबळांसोबत नेमकी काय चर्चा झाली? शरद पवारांनी सगळचं सांगितलं

या करारानुसार वाघनखे लंडनहून (London) विशेष विमानाने मुंबईत (Mumbai) दाखल झाली. राज्यातील जनतेला ही वाघनखे पाहता यावीत यासाठी टप्प्याटप्प्याने चार वस्तू संग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनखे ठेवण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा : शरद पवार नाशकातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

दरम्यान, छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखांनी अफझल खानाचा वध केला तीच ही वाघनखे आहेत का याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही शिवरायांचीच वाघनखे असल्याचे स्पष्ट केले होते. ही वाघनखे महाराष्ट्रातून तीन वर्षांनी पुन्हा लंडन येथील म्युझियममध्ये नेण्यासाठी १४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे मुनगंटीवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या