मुंबई | Mumbai
राज्यसभा निवडणुकांनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहे. ९ जागांसाठी ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडेल. विधान परिषदेच्या या जागांसाठी १२ मे रोजी मतदान पार पडणार आहे. सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान होईल. तर त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ५, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा येण्याची शक्यता आहे. विधानसभेत महायुतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या जागांवर महायुतीचे वर्चस्व असेल. तसेच महाविकास आघाडीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे येते की अन्य उमेदवाराचे नाव पुढे केले जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गट काय निर्णय घेतो याकडे महाविकास आघाडीचेही लक्ष लागले आहे.
Nashik IT Case: पिडितांच्या गोपनियतेचा प्रश्न; न्यायालयाचा मोठा निर्णय, बंद दाराआड सुनावणी होणार
उध्दव ठाकरे निवडणुक लढवणार की नाही?
विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे जाणार की दुसरा उमेदवार देणार?, ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेणार याकडे महाविकास आघाडीचे लक्ष आहे. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास फारसे इच्छुक नसले तरी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे विधान परिषदेवर परत यावे, यासाठी आग्रही असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाकडून अन्य उमेदवार इच्छुक
ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे, माजी खासदार विनायक राऊत, माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार वैभव नाईक, सचिव सूरज चव्हाण या पाच ते सहा नावाची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतात की आपल्या पक्षातील इतर नेत्याला विधान परिषदेसाठी संधी देतात हे पाहावे लागेल.
संजय राऊत काय म्हणाले?
माझ्या माहितीनुसार, मला जे समजतं त्या नुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जर पुन्हा उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. आता महाविकास आघाडीकडून खासकरून शिवसेनेकडून काय भूमिका घ्यायची या संदर्भात आम्ही महाराष्ट्रात बसून 1-2 दिवसांत निर्णय घेऊ असे संजय राऊत म्हणाले.
या आमदारांचा कार्यकाळ संपतोय
उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
विधान परिषदेची पोटनिवडणूक
प्रज्ञा सातव
विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026





