मुंबई । Mumbai
पावसाळी अधिवेशनाला २७ जूनपासून म्हणजे उद्यापासून सुरूवात होणार आहे. यंदाचे अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये महाविका आघाडी वेगवेगळ्या मुद्द्यावर महायुतीला घेरण्याची शक्यता आहे.
दरम्यान उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनावर भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधानपरिषदेच्या मतदानासाठी आज ठाकरे कुटुंबीय मतदान केंद्रावर आले होते, त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उध्दव ठाकरेंनी राज्य सरकावर टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे, सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळे, उद्या मी सर्व विषयावर बोलेन, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने विरोधकांन चहापानांचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आज सायंकाळी सह्याद्री अतिथी गृहावर विरोधकांसाठी चहापान कार्यक्रम आयोजित केला आहे. मात्र, विरोधकांनी अघोषित परंपरेनुसार चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे.