मुंबई
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज मुंबईतील शिवाजी पार्कवर संपन्न झाला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या पार्श्व भूमीवर उद्धव ठाकरे काय संबोधन करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात तुफान टोलेबाजी केली. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे यांचे नाव न घेता जहरी टीका केली. तसेच भाजपाच्या कारभारावरही भाष्य केले.
पावसात शिवाजी पार्कवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा मेळावा झाला. आजच्या मेळाव्यासाठी मुंबई, ठाण्यासह पालघर, नवी मुंबई, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सुरवात जीवाला जीव देणारी माणसे हीच खरे सोने आहे. पळवलेल ते पितळ होत आज माझ्या कडे अस्सल शिवसैनिकांचे सोन आहे. पावसात सुरु असलेल्या मेळाव्याला संबोधताना हा पेटलेला वणवा भर पावसात देखील विझू शकणार नाही.असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या संकटाने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. राज्याच्या निम्म्या भागाला पावसाने जोरदार तडाखा दिल्याने कृषी अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. अति वृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरकारने माफ करावे असे उद्धव ठाकरे म्हणाले. धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या देशा बरोबर तुम्ही क्रिकेट खेळतात या वरून उद्धव ठाकरेंनी सरकार वर टीका केली आहे.
बिहार मध्ये निवडणुकाच्या काळात महिलांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा करण्यात आले. परंतु उध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी सरकार कडे पैसे नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबई इकडे व्यापारी म्हणून तुम्ही मुंबई कडे बघत आहात तर आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघत आहोत. व्यापाऱ्यांच्या खिशात जर मुंबई जाणार असेल तर त्यास आमचा सक्त विरोध असेल. असे मुंबई विषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले
शिवसेना आणि मनसे युती बाबत बोलताना , आम्ही एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी, मराठी वरती हिंदीची सक्ती बाबत आमच्या वर सक्ती करायची, जिथे मराठीचा घात तिथे मराठी माणसात फुट पडू देणार नाही , आम्ही ते ठाम पणे सांगत आहोत उद्धव ठाकरे म्हणाले.




