Saturday, September 28, 2024
HomeनगरJayant Patil : नगरमध्ये गुंडगिरी, काहीही करा यांना घालवा

Jayant Patil : नगरमध्ये गुंडगिरी, काहीही करा यांना घालवा

अहमदनगर | प्रतिनिधी

नगरमध्ये वाढत्या दादागिरी, गुंडगिरी, ताबामारीमुळे जनता त्रस्त आहे. काहीही करा यांना घालवा असे नागरिक म्हणत आहेत.

- Advertisement -

बलाढ्य विखेंना पाडून लंके निवडून येऊ शकतात. तर आपल काय अशी भिती नगरमधील लोकप्रतिनिधींना वाटायला लागलीय. त्यामुळेच जुना विश्‍वास आता जागा झालाय. जुन्या विश्‍वासाचा किती वेळा धावा करायचा. नवा विश्‍वास आहे की नाही. नवा विश्‍वास समोर आणण्याचे काम करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेची सभा काल, शुक्रवारी येथील नंदनवन लॉन्समध्ये झाली. यावेळी झालेल्या भाषणात नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावर आ. पाटील यांनी जोरदार टीका केली. दरम्यान सभेपूर्वी नगर शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली बालिकाश्रम रस्ता-भूतकरवाडी येथून रॅली काढण्यात आली. नंदनवन लॉन्स येथील सभेस खा. डॉ. अमोल कोल्हे, खा. निलेश लंके, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, युवक अध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, शौकत तांबोळी, डॉ. अनिल आठरे, सुनील गव्हाणे, कराळे मास्तर आदी उपस्थित होते. शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

विश्‍वास जुना…

जाहिरातबाजीवर बोलताना आ. पाटील म्हणाले, नगर शहरात गुंडगिरी व ताबेमारी वाढली आहे. काही व्यापारी मला भेटले, तेही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत रोज सकाळी विश्‍वास जुना…कशाला करता? आमची राष्ट्रवादी सत्तेवर आल्यावर तुम्हाला नवा विश्‍वास आम्ही देऊ, असे स्पष्ट करून ते म्हणाले, त्यांना भीती आहे की, विखेंसारखा नेत्याचा पराभव होऊ शकतो, तर आपले काय?. म्हणून त्यांचा सारा खटाटोप सुरू आहे, मात्र नगरची जनता सूज्ञ आहे.

लोकसभेला त्यांनी बलाढ्य शक्तीचा पराभव केला. जनशक्तीने धनशक्तीचा पराभव केला व खा. लंके यांना निवडून आणले. हेच आता विधानसभेत करायचे आहे. महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले नसल्याने आज उमेदवारी जाहीर करू शकत नाही. पण महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी आपल्यात स्पर्धा करू नये. महाविकास आघाडी म्हणूनच संघटित ताकद निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

‘त्या’ पावसाला बळी पडू नका

10 ते 12 ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर होईल. 12 नोव्हेंबर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यात काळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या पावसाला बळी पडू नका. लोकसभेलाही जास्त पाऊस झाला मात्र, तुम्ही पावसाला बळी पडला नाहीत. हीच भूमिका आताही घ्यायची आहे. दरम्यान, सत्ताधारी मत विभाजनासाठी तिसर्‍या आघाडीला बळ देत आहे. मात्र, त्यांचा डाव सपशेल फेल ठरणार आहे, अशीही टीका जयंत पाटील यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या