Friday, May 3, 2024
Homeजळगावधक्कादायक : अल्पवयीन गर्भवती मुलीचा मृत्यू..!

धक्कादायक : अल्पवयीन गर्भवती मुलीचा मृत्यू..!

मुक्ताईनगर– Muktainagar

तालुक्यातील मधापुरी (Madhapuri) येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी गर्भवती (minor pregnant girl) असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालात उघड झाले. सदर मुलीचा 17 जून 2022 रोजी जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल (Civil Hospital) मध्ये उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. तेव्हा या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान सदर मुलीच्या शवविच्छेदन अहवालात (autopsy report) सदर अल्पवयीन मुलगी ही दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती (pregnant) असल्याचे निष्पन्न झाले आहे

- Advertisement -

यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान या संदर्भात मुक्ताईनगर पोलीसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अल्पवयीन मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत तशाच प्रकारचा अत्याचार सदर मुलीवर करण्यात आला असल्याची शक्यता आहे.

याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रवण धोंडू जवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , जळगाव येथील सिविल हॉस्पिटल मध्ये 16 जून 2000 22 रोजी सकाळी नऊ वाजे पूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला होता.

त्या संदर्भात सतरा रोजी अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली होती याचा तपास हेड कॉन्स्टेबल श्रावण जवरे यांच्याकडे होता परंतु सदर मुलीचा शवविच्छेदन अहवाल 5 जुलै रोजी प्राप्त झाला त्यात वैद्यकीय अधिकारी यांच्या द्वारा देण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की सदर पीडित अल्पवयीन मुलगी ही साधारणतः दोन ते अडीच महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.

त्यामुळे अज्ञाताविरुद्ध भादवी ३७६ पोक्सो4, 5 (जे ) 2, 6 प्रमाणे मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर हे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या