दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
तालुक्यातील सोनगाव येथील एक विहिरीत दोन वर्षाची चिमुकली मातेच्या कमरेला बांधलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्या असून आईने मुलीसह आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून दिंडोरी पोलिसांनी आकस्मित मृत्युंचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून या बाबत अधिक तपास सुरु आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनगाव येथे सकाळी 9.30 वाजता सुगंधा सोमनाथ गवळी (वय 28 ) व नेहा सोमनाथ गवळी (वय 2 )या मायलेकीचा मृतदेह एक विहिरीत आढळला. यात नेहा ही आईचे कमरेला स्कार्फ ने बांधलेली आढळून आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणी करत मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात दिले. पोलिसांनी आकास्मित मृत्युंची नोंद केली असून पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किसन काळे, हवालदार जी. एस. पवार करत आहे.





