Thursday, June 4, 2026
Homeदेश विदेशफारुक अब्दुल्लांवर गोळी झाडणाऱ्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, दैव बलवत्तर म्हणून…

फारुक अब्दुल्लांवर गोळी झाडणाऱ्याचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, दैव बलवत्तर म्हणून…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांच्या हत्येचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोर कमल सिंग जामवाल याने धक्कादायक खुलासा केला आहे. बुधवारी रात्री उशिरा एका लग्न सोहळ्यात असताना जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा प्रयत्न झाला. फारूख अब्दुल्ला यांची गेल्या २० वर्षापासून हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूतील ग्रेटर कैलास परिसरात असलेल्या रॉयल पार्कमध्ये एक लग्न सोहळा होता. त्याच सोहळ्यात ही घटना घडली. फारुक अब्दुल्ला यांच्या सुरक्षा पथकात पोलीस आणि एनएसजी कमांडो होते. त्यांनी लगेच आरोपीला रोखल्याने अब्दुल्लांचा जीव वाचला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याचे रिव्हॉल्व्हरही ताब्यात घेतले आहेत.

- Advertisement -

२० वर्षापासून हत्या करण्याचा प्रयत्न सुरु
फारूख अब्दुल्ला यांची गेल्या २० वर्षापासून हत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या घटनेमागे दहशतवादी कटाचा दावा फेटाळून लावला आहे. एका लग्न समारंभात फारूख अब्दुल्ला यांच्यावर कमल सिंगने जवळून गोळी झाडली पण, सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे या हल्ल्यातून अब्दुल्ला थोडक्यात बचावले.

India Iran: भारतासाठी मोठी आनंदाची बातमी! होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांसाठी ‘सेफ पॅसेज’

दैव बलवत्तर म्हणून ते वाचले
हल्ल्यानंतर पोलिसांनी ६३ वर्षीय कमल सिंग जामवाल याला अटक केली. हल्ला का केला याबाबत विचारणा केली असता कमल सिंग याने धक्कादायक खुलासे केले. “माझ्याकडे असणारे अग्निशस्त्र माझेच असून त्याचा माझ्याकडे परवाना आहे. गेल्या २० वर्षापासून मी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करत आहे. हा माझा वैयक्तिक अजेंडा आहे. दैव बलवत्तर म्हणून ते वाचले”, असे कमल सिंग पोलिसांना माहिती देताना म्हणाला.

कोण आहे कमल सिंग जामवाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचे नाव कमल सिंह जामवाल असे आहे, तो जम्मूतील पुरानी मंडी भागात राहतो. कमल सिंह जामवाल याचा जन्म १९६३ मध्ये झाला होता. जम्मूतील ओल्ड सिटी परिसरात त्याचे अनेक गाळे आहेत. ते गाळे भाड्याने दिलेले असून, त्यातून येणाऱ्या पैशांवर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल
फारूख अब्दुल्ला यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जम्मू येथील एक लग्न समारंभात अब्दुल्ला यांनी हजेरी लावली होती. लग्नमंडपातून इतर सहकारी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुरींदर चौधरी यांच्यासोबत ते जात असताना कमल सिंगने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. झाडलेली गोळी सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे फारूख अब्दुल्ला यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले. यानंतर कमल सिंगची धरपकड करण्यात आली.

ताज्या बातम्या

विराट

Virat Kohli: टीम इंडियाला मोठा धक्का! विराट कोहली अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय...

0
मुंबई | Mumbaiभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघ आणि क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली...