Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारधक्कादायक : साडे तीनशे बालकांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद शासन दरबारी नाही

धक्कादायक : साडे तीनशे बालकांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद शासन दरबारी नाही

राकेश कलाल

नंदुरबार | NANDURBAR

- Advertisement -

नंदुरबार जिल्हयात सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या दोन वर्षात तब्बल १ हजार ५३९ बालमृत्यू (infant mortality)तसेच ३८ मातामृत्यू (maternal mortality) झाले आहेत. या बालकांच्या मृत्यूची कारणे (Causes of death) वेगवेगळी दाखविण्यात आली आहेत. परंतू ३५० बालकांचा मृत्यू कोणत्या आजाराने (With what disease?) झाला याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी (Recorded in the Department of Health) नाही. त्यामुळे सदर मृत्यू कुपोषणाने तर झाले नाहीत ना? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

VISUAL STORY : सौंदर्याला वय असते की वयाला सौदर्य ? चक्रावलात ना ! मग या 42 वर्षीय अभिनेत्रीच्या अदा पाहाच…

नंदुरबार जिल्हयात सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या दोन वर्षात एकुण तब्बल १ हजार ५३९ बालमृत्यू तसेच ३८ मातामृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे.

२०२१-२२ मध्ये ७७९ तर सन २०२२-२३ मध्ये ७६० बालकांचा मृत्यू झाला आहे. सन २०२२-२३ मध्ये झालेल्या ७६० बालमृत्यूंमध्ये ४५० बालके व ३१० बालिकांचा समावेश आहे. त्यातील ५४५ बालके २८ दिवसांच्या आतील, ११९ बालके २९ दिवस ते एक वर्षादरम्यान, ९६ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

धावत्या ट्रकला लागली आग अन् पुढे झाले असे काही….

सन २०२२-२३ मध्ये अक्कलकुवा तालुक्यात १०१ बालमृत्यू झाले आहेत. त्यात ५५ बालके तर ४६ बालिकांचा समावेश आहे. त्यातील ३५ बालके २८ दिवसाच्या आतील, ३६ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर ३० बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

धडगाव तालुक्यात ९० बालमृत्यू झाले आहेत. त्यात ५३ बालके तर ३७ बालिकांचा समावेश आहे. त्यातील ३७ बालके २८ दिवसाच्या आतील, ३० बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर २३ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

नंदुरबार तालुक्यात ३० बालमृत्यू झाले आहेत. त्यात ११ बालके तर १९ बालिकांचा समावेश आहे. त्यातील १३ बालके २८ दिवसाच्या आतील, ६ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर ११ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

नवापूर तालुक्यात ३३ बालमृत्यू झाले आहेत. त्यात २३ बालके तर १० बालिकांचा समावेश आहे. त्यातील ९ बालके २८ दिवसाच्या आतील, १३ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर ११ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

शहादा तालुक्यात ३० बालमृत्यू झाले आहेत. त्यात २० बालके तर १० बालिकांचा समावेश आहे. त्यातील १९ बालके २८ दिवसाच्या आतील, ११ बालके २९ दिवस ते १ वर्ष वयोगटातील आहेत.

या कारणांसाठी जिल्हा उपनिबंधकांना घालणार घेराव

तळोदा तालुक्यात १४ बालमृत्यू झाले आहेत. त्यात ८ बालके तर ६ बालिकांचा समावेश आहे. त्यातील ६ बालके २८ दिवसाच्या आतील, ४ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर ४ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत.

अशाप्रकारे सन २०२२-२३ मध्ये ७६० बालकांचा मृत्यू झाला असून त्यात ४५० बालके व ३१० बालिकांचा समावेश आहे. त्यातही ५४५ बालके २८ दिवसाच्या आतील, ११९ बालके २९ दिवस ते १ वर्षादरम्यान, तर ९६ बालके १ ते ५ वर्ष वयोगटातील आहेत. यापैकी २७४ बालकांचा घरी, ४६४ बालकांचा सरकारी रुग्णालये, १ बालकाचा खाजगी रुग्णालयात तर २१ बालकांचा संक्रमणादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

यातील ४७ बालकांचा न्युमोनियामुळे, १५१ बालकांचा मुदतपूर्व प्रसुत झाल्याने तसेच कमी वजनामुळे, ३ बालकांचा अतिसारामुळे, ९५ बालकांचा जंतुसंसर्गामुळे, ९६ बालकांचा जन्मतः श्‍वासाच्या त्रासाने, ३५ बालकांचा जन्मजात व्यंगामुळे, १४० बालकांचा श्‍वसनाच्या त्रासामुळे,

१६ बालकांचा इजा व अपघातामुळे, ५ बालकांचा पाण्यात बुडून, १२ बालकांचा सर्पदंश किंवा विषबाधेने, १० बालकांचा अकस्मात, ७ बालकांचा मेंदूज्वराने, १४३ बालकांचा इतर आजारांनी मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे.

जळगावकरांनो पाणी जपून वापरा..

दरम्यान, सन २०२१-२२ व सन २०२२-२३ मध्ये झालेल्या एकुण १ हजार ५३९ बालमृत्यूंपैकी ३५० बालकांच्या मृत्यूचे कारण इतर कारणाने मृत्यू झाला अशी नोंद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अहवालात करण्यात आली आहे.

यातील २०७ बालके २०२१-२२ मध्ये तर १४३ बालके २०२२-२३ मध्ये इतर कारणांनी मयत झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही वर्षातील ३५० बालमृत्यूच्या कारणांची नोंद नसल्याने या मृत्यूंबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

तब्बल साडे तीनशे बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आलेली असतांना त्यांची कारणे लपविण्यात आल्याने सदरचे बालमृत्यू हे कुपोषणाने तर झाले नाहीत ना? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींनी दखल घेवून चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागातर्फे कोटयावधी रुपयांच्या योजना राबविल्या जातात. तरीही एवढया मोठया प्रमाणावर बालमृत्यू होत असतील तर संबंधीत यंत्रणा काय करते? असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या