Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाथोडक्यात हॅट्रीक हुकली, मनु भाकरचं तिसऱ्या पदकाच स्वप्न भंगल; चौथ्या स्थानावर मानावं...

थोडक्यात हॅट्रीक हुकली, मनु भाकरचं तिसऱ्या पदकाच स्वप्न भंगल; चौथ्या स्थानावर मानावं लागलं समाधान

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मनु भाकरला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग तिसरे पदक पटकावण्याची संधी हुकली. २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ८व्या सिरीजमध्ये ती चौथ्या स्थानी राहिल्याने ती एलिमिनेट झाली.

यायाधी तिने १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक आणि मिश्र गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे. मनूला तिसऱ्या २५ मीटर प्रकारात यश आले नसले तरी तिने कमवलेल्या दोन पदकांमुळे भारताची मान उंचावली आहे. मनून भाकरने २५ मीटर पिस्तूल प्रकारात लक्ष्याच अचूक वेध घेत पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली होती. तिने पात्रता फेरीत दुसरा क्रमांक पटकावून थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

- Advertisement -

कोरियाची खेळाडू पहिल्या क्रमांकावर कायम होती. मनूने सातत्याने चांगले शॉट्स खेळल्याने तिने आणखी एक पदक निश्चित केले असे सर्वांना वाटू लागले. अखेरचे तीन शॉट्स राहिले असताना सामन्याच्या अंतिम दिशेने मनूने पदकाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण, कोरियन खेळाडू वरचढ ठरल्याने मनूला अखेर पदकापासून एक पाऊल दूर राहावे लागले अन् ती चौथ्या क्रमांकावर राहिली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरला १० आणि २५ मीटर प्रकारात फायनल गाठता आली नव्हती. १० मीटर पिस्टल प्रकारात मनु भाकरला तांत्रिक बिघाडामुळे बाहेर पडावं लागलं होतं. पण यावेळी तिने तीन प्रकारात फायनल गाठून कमाल केली. टोकियो ऑलिम्पिकच्या तुलनेत यावेळी तिने खेळात सुधारणा करत थेट फायनलला धडक मारली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...