Friday, November 22, 2024
Homeक्रीडाParis Olympic 2024 : मनू भाकेरने रचला इतिहास; नेमबाजीत मिळवून दिले पहिले...

Paris Olympic 2024 : मनू भाकेरने रचला इतिहास; नेमबाजीत मिळवून दिले पहिले पदक

नवी दिल्ली | New Delhi

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) भारताने आपले पदकांचे खाते उघडले असून नेमबाजीत पहिले पदक मिळविले आहे. भारताची २२ वर्षीय नेमबाज मनू भाकेरने (Manu Bhaker) महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्यपदक (Bronze Medal) पटकावत इतिहास रचला आहे. हे पदक जिंकत मनूने भारताचा १२ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Paris Olympics 2024 : भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेची निराशाजनक सुरुवात!

मनुची फायनलमध्ये चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या फेरीत तिने ५०.४ गुण कमावले होते. त्यानंतर तीन फेऱ्यांनंतर मनुच्या खात्यामध्ये १००.३ गुण होते. यानंतर मनूने १२१.२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान झाली होती.त्यानंतर मनुचे १४०.८ गुण झाले होते आणि ती तिसऱ्या स्थानावर होती. पॉईंट १ गुणाने मागे राहिल्याने मनू भाकेरला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनू भाकेरने अंतिम सामन्यात २२१.७ गुणांसह हे पदक जिंकले असून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिले पदक आहे. तर कोरियाच्या नेमबाजाने (Shooting) आघाडी मिळवली.

हे देखील वाचा : Maharashtra Governor : सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल; रमेश बैस यांची उचलबांगडी

मनू भाकेरने २१ व्या शॉटने दुसऱ्या स्थानावर पोहोचली होती, पण अखेरीस ती तिसऱ्या स्थानावर राहिली. कोरियाच्या दोन्ही नेमबाजांनी सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. मनू भाकेर ही भारताला नेमबाजीमध्ये भारताला पदक जिंकवून देणारी पहिली महिला नेमबाज ठरली आहे. सुरूवातीपासूनच मनू दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी कायम होती पण अवघ्या एका पॉईंटने मनू मागे राहिली. पण तिने भारताला पदक पटकावून दिले.

हे देखील वाचा : पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकरांसह विधानपरिषदेच्या ११ सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

दरम्यान, मनू भाकेरसाठी टोकियोमधील नेमबाजी स्पर्धेची अंतिम फेरी खूपच धक्कादायक ठरली होती. पदक मिळण्याची खात्री असतानाच तिच्या पिस्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ती अंतिम फेरीत पोहोचू शकली नव्हती. या प्रकारानंतर तिला अश्रू अनावर झाले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे पॅरिस ऑलिम्पिकस्पर्धेत तिने चांगली कामगिरी करत शनिवारी पहिल्याच दिवशी अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे संपूर्ण देशवासियांच्या तिच्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. यानंतर अखेर तिने हा विश्वास सार्थ ठरवत आज कांस्यपदकावर मोहोर उमटवली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या