Friday, May 16, 2025
Homeब्रेकिंग न्यूजअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार; शुटरचा खात्मा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रचारसभेत गोळीबार; शुटरचा खात्मा

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार (Republic Party Candidate) डोनाल्ड ट्रम्प शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे अमेरिकेच्या (America) अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार रॅलीला संबोधित करत होते. यावेळी त्यांच्यावर एका अज्ञात हल्लेखोराने गोळी झाडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने ही गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला चाटून गेल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या घटनेमुळे अमेरिकेसह जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : सात राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीचा डंका; भाजपाचा दारूण पराभव

डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या कानाला गोळी चाटून गेल्याने ते पटकन खाली कोसळले. यानंतर जमावामध्ये निर्माण झालेल्या दहशतीदरम्यान, गुप्तहेर खात्याने लगेच डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षित केले. त्यांच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्ताचे डाग दिसत होते. ते उभे राहून हात उंचावताच गर्दीतून आवाज आला. त्यानंतर काही वेळातच ते तेथून निघून गेले. तर एफबीआयकडून (FBI) हा हत्येचा प्रयत्न होता,असे बोलले जात असून याबाबत दुजोरा देण्यात आला आहे. त्यामुळे भर निवडणुकीत (Election) हत्येचा प्रयत्न झाल्याने सुरक्षेचा सुद्धा मुद्दा उपस्थित झाला आहे.

हे देखील वाचा : महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचे लक्ष्य – पंतप्रधान मोदी

दरम्यान, ट्रम्प यांच्यावर हल्ला करणाऱ्या शूटरची ओळख आणि हेतू अद्याप अस्पष्ट असल्याचे समोर आले आहे. तर सीक्रेट सर्व्हिसच्या निवेदनानुसार, या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यात हल्ला करणारा शूटर मारला गेला आहे. तर या हल्ल्यात दोन प्रेक्षक जखमी झाले आहेत. तसेच या घटनेचा हत्येचा प्रयत्न म्हणून तपास केला जात आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एपीने दिली आहे.

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शाहांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं?

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती स्थिर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी चाटून गेल्याने त्यांच्या कानावरील डोक्याचा भाग रक्तबंबाळ झाला. यानंतर त्यांना त्याच स्थितीत स्टेजवरून हलवण्यात आले. त्यानंतर ट्रम्प यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “गोळीबारावर जलद प्रतिसाद दिल्याबद्दल युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आणि कायदा अंमलबजावणी यांचे आभार मानले. आपल्या देशात असे कृत्य घडणे हे अविश्वसनीय आहे. शूटर, जो आता मरण पावला आहे, याबद्दल सध्या काहीही माहिती नाही”, असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी या घटनेनंतर ट्रम्प यांच्याशी संवाद साधला आणि हल्ल्याचा निषेध केला. तसेच पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शापिरो आणि सभागृहाचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांच्यासह इतर राजकीय नेत्यांनीही हिंसाचाराचा निषेध केला आहे. याशिवाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह जगभरातील नेत्यांनी सुद्धा या घटनेचा निषेध केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

ट्रकची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा मृत्यू

0
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon भरधाव वेगात जाणार्‍या मालट्रकने पाठीमागून दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवरून जाणारे दाम्पत्य ठार झाले. मालेगाव-सटाणा रस्त्यावरील लखमापूर नजीकच्या चिंचावड फाट्याजवळ हा अपघात...