Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शाहांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं?

विधानपरिषदेच्या निकालानंतर अजित पवारांची दिल्लीवारी; अमित शाहांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत खलबतं?

पंकजा मुंडे, भरत गोगावले यांना संधी मिळणार?

मुंबई | Mumbai

- Advertisement -

विधानपरिषदेच्या काल झालेल्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2024) महायुतीचे (Mahayuti) ९ तर महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) २ उमेदवार विजयी झाले आहेत.त्यानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच तडकाफडकी दिल्लीत दाखल होत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून दादांची आजची दिल्लीवारी ही मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने असल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा : “आमदारांना शेअर मार्केटसारखा भाव, कुणाला २५ कोटी तर कुणाला…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारचा पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या वाटेला किती मंत्रीपदं येणार याबाबत महायुतीमधील तिन्ही पक्षांत संभ्रम निर्माण झाला आहे. त्याच अनुषंगाने अजित पवार यांची ही दिल्लीवारी असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर अजित पवार गटाच्या वाटेला किती मंत्रीपदे येणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet expansion) होणार, अशा चर्चा सुरू होत्या. त्यामुळे भावी मंत्र्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होतं.तर काही इच्छुकांनी मंत्रि‍पदासाठी फिल्डिंग देखील लावली होती. पंरतु, त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर आता पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे, भरत गोगावले यांना संधी मिळणार?

राज्यातील महायुती सरकारचा तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यातील १७,१८ किंवा १९ जुलैला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यात महायुतीमधील प्रत्येक पक्षाला दोन मंत्रि‍पदे मिळणार असून भाजपकडून पंकजा मुंडे, शिंदेंच्या शिसेनेकडून आमदार संजय शिरसाठ आणि भरत गोगावले मंत्रि‍पदाच्या शर्यतीत आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही दोन नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात कुणाच्या गळ्यात मंत्रि‍पदाची माळ पडणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या