Sunday, September 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजभाषण करत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, VIDEO आला समोर

भाषण करत असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार, VIDEO आला समोर

पेनसिल्व्हेनिया । Pennsylvania

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर निवडणूक प्रचारसभेत (Election Rally) प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहे.

- Advertisement -

ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला एक गोळी लागली. ट्रम्प शनिवारी रात्री पेनसिल्व्हेनियातील बटलर येथील एका रॅलीला संबोधित करत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आली. य़ा घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला. ट्रम्प यांना व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आलं. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला ठार केलं.

हे देखील वाचा : IND VS PAK : आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान विजेतेपदासाठी भिडणार

या गोळीबाराच्या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ट्रम्प भाषण देत असताना गोळ्या झाडल्याचं दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प उजव्या हाताने आपला कान झाकतात आणि मंचाच्या खाली झुकतात. सीक्रेट सर्व्हिस एजंट लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ट्रम्प उठतात आणि रॅलीत आलेल्या लोकांकडे पाहून धैर्याचा संदेश देतात. त्यांच्या उजव्या कानावर आणि चेहऱ्यावर रक्त दिसत आहे.

या घटनेनंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेत असे काही घडू शकते यावर विश्वास बसत नाही. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीबद्दल मला कोणतीही माहिती नाही, जो आता मरण पावला आहे. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली होती. मला लगेच कळले. काहीतरी गडबड होते कारण मला मोठा आवाज ऐकू आला, गोळ्या झाडल्या गेल्या आणि लगेच रक्तही आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

या घटनेबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या सभेदरम्यान झालेल्या या घटनेची मी माहिती घेतली आहे. सुदैवाने ट्रम्प सुरक्षित आहेत. ट्रम्प यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच या रॅलीमध्ये सहभागी झालेले सर्वजण सुरक्षित असावेत यासाठी मी प्रार्थना करतो. अमेरिकेत अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेला स्थान नाही. एक देश म्हणून आपण एकत्र यायला हवे आणि अशा घटनांचा निषेध नोंदवायला हवा, असे मत बायडेन यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या