Monday, June 24, 2024
Homeनाशिकश्रमिक चालक मालक सेनेतर्फे धरणे आंदोलन

श्रमिक चालक मालक सेनेतर्फे धरणे आंदोलन

पंचवटी | प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, तसेच ट्रक चालकांच्या विविध मागण्यांसाठी येत्या मंगळवारी (दि. १२) श्रमिक चालक मालक सेनेतर्फे प्रलंबित व इतर मागण्यांसाठी सकाळी ११ ते ५ या वेळेत रिक्षा- टॅक्सी सेवा बंद करत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रमिक सेनेचे महानगरप्रमुख मामासाहेब राजवाडे यांनी दिली आहे.

श्रमिक सेनेतर्फे रिक्षा,टॅक्सी, टेम्पो चालक-मालक यांनी विविध मागण्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले होते. मात्र,त्याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.

त्यामुळे प्रलंबित व इतर विविध मागण्यांसाठी येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सकाळी ११ ते ५ यावेळेत श्रमिक सेना संस्थापक सुनील बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्याध्यक्ष भगवान पाठक, जिल्हाध्यक्ष अजय बागुल, मामासाहेब राजवाडे, शंकर बागुल, नवाज सय्यद, राजेंद्र वागले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व रिक्षा, टॅक्सी, टेम्पो चालक-मालक आंदोलन करणार आहेत

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या