Sunday, September 29, 2024
Homeनाशिकश्री व्यंकटेश बालाजी विमानोत्सव थाटात संपन्न

श्री व्यंकटेश बालाजी विमानोत्सव थाटात संपन्न

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

कापडपेठेतील प्रसिद्ध श्री बालाजी मंदिरात शनिवारी (दि.28) सकाळी 9 वाजता श्री व्यंकटेश बालाजी विमानोत्सव अत्यंत भक्तिभावाने झाला. उत्सवाची सुरुवात श्री व्यंकटेश सुप्रभातम् पठणाने झाली. अनिकेत गाढवे, राजेश, सारंग, सुशांत, श्रीनिवास नाशिककर, विनय जोशी, प्रसाद गरबे, अथर्व भगरे, अश्विनी देशमुख, शारदा मूर्ती, वंदना देशपांडे, तोरल टकले, सुवर्णा बिरारी व इतर अनेक भाविकांनी पठण सादर केले.

यानंतर श्री व्यंकटेश बालाजी संस्थानचे महंत डॉ. रमेश बालाजीवाले यांनी भक्तांना श्री व्यंकटेश प्राकट्याची कथा सांगितली. सोहळ्याच्या शिखर क्षणी श्री व्यंकटेशांनी विमानावर प्रगट होऊन भक्तांना पवित्र दर्शन दिले.

श्री व्यंकटेशाची विशेष पूजा विक्रम बालाजीवाले यांच्या हस्ते पार पडली, तर मंत्र आणि स्तोत्र पठणाची जबाबदारी ध्रुव बालाजीवाले यांनी पार पाडली. यानंतर श्री व्यंकटेशाला व्यंकटेश सहस्त्रनाम तुलसी अर्चना करण्यात आली. उत्सवाच्या या खास प्रसंगी बालाजीवाले घराण्याचे श्री तिमय्या महाराजांनी रचलेल्या पारंपरिक ‘धावा’चे भक्तांनी एकत्रित पठण केले.

यावेळी संस्थानचे सेक्रेटरी अ‍ॅड. हर्षवर्धन बालाजीवाले यांनी उत्तरपूजा करून आलेल्या मान्यवर आणि भाविकांचे स्वागत केले. ज्योत्स्ना बालाजीवाले, डॉ. वैशाली बालाजीवाले, ऐश्वर्या बालाजीवाले, अ‍ॅॅड. राजेश्वरी बालाजीवाले, शुभलक्ष्मी बालाजीवाले, मानसी केळकर आणि अवंती केळुसकर यांनी प्रसाद वितरण आणि सुवासिनींना हळदी-कुंकू दिले.

विमानोत्सवाकरता अवधूत देशपांडे आणि प्रणव पटेल यांनी पुष्पमालिकांसह पुष्पसेवा अर्पण केली, तर अन्नामाचार्य यांनी रचलेल्या मंगलम्च्या पारंपरिक पठणाने आणि व्यंकटेशाच्या जयघोषाने उत्सवाची सांगता झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या