Thursday, May 15, 2025
Homeमनोरंजननिधनाच्या अफवांवर श्रेयस तळपदे भडकला; म्हणाला, "मी जिवंत आहे, माझी मुलगी..."

निधनाच्या अफवांवर श्रेयस तळपदे भडकला; म्हणाला, “मी जिवंत आहे, माझी मुलगी…”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मराठी आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदेच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यामुळे चाहते हैराण झाले होते. अचानक श्रेयसबद्दलची अशी बातमी आल्याने नक्की काय झाले याचा शोध चाहत्यांकडून घेऊ लागला होता.

मात्र सोशल मीडियावर अभिनेता श्रेयस तळपदे याच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली जात आहे. या खोट्या बातमीवर आता श्रेयसने संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्याने,’मी जिवंत आहे…’ असं म्हणत स्वत:च पुढे येऊन याबाबत खुलासा केला आहे. श्रेयसने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

श्रेयसने म्हंटले आहे की, ‘मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जिवंत, आनंदी आणि निरोगी आहे. ज्या पोस्टमध्ये माझ्या मृत्यूचा दावा केला जात होता, त्या पोस्टची मला माहिती मिळाली. मला माहीत आहे की, विनोदाचे स्वतःचे महत्त्व आहे. परंतु, जेव्हा त्याचा गैरवापर केला जातो, तेव्हा खूप मोठे नुकसान होऊ शकते. विनोद म्हणून सुरू झालेल्या गोष्टीने आता प्रत्येकजण तणावात आहे आणि ज्यांना माझी काळजी आहे, विशेषत: माझ्या कुटुंबियांच्या भावनांशी असे लोक खेळ खेळत आहेत.’

श्रेयसने पुढे लिहिले, ‘मला एक लहान मुलगी आहे, जी दररोज शाळेत जाते. ती माझ्या तब्येतीबद्दल काळजीत असते आणि मला सतत प्रश्न विचारत राहते की, मी बरा आहे का? तिला हे सतत जाणून घ्यायचं असतं. या खोट्या बातम्या तिला अधिक दुःखी करतात आणि तिला असेच आणखी प्रश्न विचारण्यास भाग पाडतात. जे या प्रकारचा मजकूर टाकत आहेत, त्यांनी ते आताच थांबवावे आणि त्याचा काय परिणाम होईल याचा विचार करावा. काही लोक खरंच माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात आणि अशा प्रकारे विनोदाचा वापर होताना पाहून मनाला अतिशय वाईट वाटतं.’

तसेच, ‘फक्त टार्गेट केलेल्या व्यक्तीलाच याचा फटका बसत नाही, तर त्याच्याशी संबंधित असलेले लोक जसे की, कुटुंब आणि विशेषत: लहान मुले ही परिस्थिती पूर्णपणे समजून घेऊ शकत नाहीत. कृपया हे थांबवा. हे असं कुणासोबतही करू नका. हे असं तुमच्या बाबतीत घडावं, असं मला अजिबात वाटत नाही. म्हणून कृपया संवेदनशील व्हा.’ अशी विनंती श्रेयसने केली आहे.

दरम्यान, १४ डिसेंबर २०२३ रोजी श्रेयसला हॉर्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोना लसीचा हा दुष्परिणाम असू शकतो असं तो या हॉर्ट अटॅकबाबत म्हणाला होता. श्रेयस तळपदे सध्या ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात श्रेयस एका खास भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी, चित्रपटाची पहिली झलक समोर आली होती, ज्यामध्ये विलक्षण स्टारकास्ट समोर आली होती. या विनोदी चित्रपटात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, अर्शद वारसी यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : लग्नाच्या फोटोने केला घात; मैत्रिणीकडून भावाकरवी मित्राचा खून

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik मित्राने (Friend) लग्नाच्या वाढदिवसाचे (Birthday) फोटो व्हाट्स अॅप स्टेटसला अपलोड केल्याने संतापलेल्या मैत्रिणीने भावासह त्याच्या मित्रांकरवी मित्राचा घरात मारहाण (Beating)...