Wednesday, May 29, 2024
Homeनगरलग्नासाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून नवदाम्पत्याची आत्महत्या

लग्नासाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून नवदाम्पत्याची आत्महत्या

श्रीगोंदा (प्रतिनिधी)

श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील फिरंगाई मळा या ठिकाणी ऊस तोडणी कामगार म्हणून चाळीसगाव (ता. गुजरदारी) येथील नवविवाहित दांपत्याने लग्नात झालेल्या कर्जाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री उशिरा घडली. विजय राजू मेंगाळ आणि आरती विजय मेंगाळ असे मयत पती पत्नीचे नाव आहे.

- Advertisement -

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव (ता-गुजरदारी) येथील उच्च सुशिक्षित विजय राजू मेंगाळ या तरुणाचे मे महिन्यात आरती मेंगाळ हिच्याशी लग्न झाले होते. लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मयत पती पत्नी ऊसतोडणी कामगार म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील फिरंगाई मळा परिसरात आले होते.

लग्नात झालेल्या कर्जाला कंटाळून या दोघांनी रविवारी रात्री उशिरा झोपडी मधील बांबूला बांधलेल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती पहाटे उस तोडणीसाठी सर्व जण निघाले असता दोघेजण दिसून आले नसल्याने विजय मेंगाळ या तरुणाच्या आईने झोपडीत जाऊन पाहिले असता दोघांनी गळफास घेतल्याचे दिसून आल्याचे सांगितले. या बाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात घारगावच्या पोलिस पाटलांनी माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या