Friday, November 22, 2024
Homeनगरश्रीगोंदा बाजार समिती सचिवासह 16 जणांवर गुन्हे दाखल

श्रीगोंदा बाजार समिती सचिवासह 16 जणांवर गुन्हे दाखल

1 कोटी 88 लाख रूपयांचे अनुदान लाटल्याचे निश्चित

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

कांदा अनुदान भ्रष्टाचार प्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती मद्ये सचिव दिलीप डेबरे यांच्यासह 16 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एकुण यात 1 कोटी 88 लाख रूपये येवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार झाला असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी राजेंद्र निकम (जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग1) यांच्या चौकशी नंतर दोन माहिनेपासून संबंधित दोषींवर गुन्हा दाखल होण्यासाठी प्रक्रिया सुरू होती. अखेर शुक्रवारी (दि.7) रोजी उशिरा जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांच्या फिर्यादीवरून. सचिव दिलीप डेबरे यांच्या सह 16 जणांवर विविध कलमांद्वारे गुन्ह्यांची नोंद श्रीगोंदा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -

विशेष पथकाने श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमद्ये येऊन कागदपत्रे तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या. संशयित 495 शेतकर्‍यांचे प्रस्ताव तपासणी केली असता त्यापैकी जवळपास 302 शेतकरी यांचे प्रस्ताव पूर्णतः बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. यात 1 कोटी 88 लाख रूपये येवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार कांदा अनुदानात झाला आहे. ही बाब चौकशीत सिद्ध झालेली असून, या घोटाळ्यामध्ये सचिव प्रत्यक्ष सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. या तपासणीमद्ये सादर केलेल्या रेकॉर्ड नुसार ऑनलाईन सातबारा उतार्‍यांची तपासणी केली असता कांदा पिकांची नोंद आढळलेली नाही. तसेच मापाडी रजिस्टर नुसार फेब्रुवारी मार्च 2023 मद्ये एकूण कांदा खरेदी 88,608 क्विंटल आहे.

मात्र डेबरे यांनी 123312 क्विंटल असे वाढीव 35003 क्विंटल बोगस खरेदी दाखवली आहे. यासाठी बोगस काटा पट्टी, बोगस रेकॉर्ड बनवले आहे. बाजार समिती सचिव यांनी पणन मंडळास चुकीची दैंनदिन कांदा आवक माहिती दिली. त्याद्वारे जो कांदा मार्केट मद्ये आलाच नाही असे त्याचे खोटे रेकॉर्ड तयार केले गेले. त्यासाठी दिवाणजी व कर्मचारी महेश मडके यांच्या माध्यमातून खोटे रेकॉर्ड तयार केले आहे.

याबाबत केलेल्या चौकशी अहवालावर गणेश पुरी यांनी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा यांना सचिव दिलीप डेबरे व दोषी इतर यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर 8 जून 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सचिव दिलीप लक्ष्मण डेबरे, आडते, व्यापारी हवालदार ट्रेडींग कंपनी व त्यांचे दिवाणजी, महादेव लोखंडे रा.चिंभळे, ट्रेडर्स़, राज ट्रेडर्स, मापाडी घनश्याम प्रकाश चव्हाण, शरद झुंबर होले, संदीप श्रीरंग शिंदे, राजू भानुदास सातव, सोपान नारायण सिदनकर, दत्तात्रय किसन राऊत, सिदनकर झुंबर किसन, शेंडगे संतोष दिलीप, भाऊ मारुती कोथिंबीरे, महेश सुरेश मडके, परशुराम गोविंद सोनवणे. यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास स.पो.नि.प्रभाकर निकम हे करत आहेत.

या दोषी कंपन्या, रक्कम
यात हवलदार ट्रेडिंगचे 207 शेतकरी, कांदा वजन 38,628 क्विंटल अनुदान रक्कम 1,35,20,118, सत्यम ट्रेडिंग कंपनीचे 40 शेतकरी कांदा वजन 5438 क्विंटल अनुदान रक्कम 19, 03,443, राज ट्रेडिंग कंपनी चे 5 शेतकरी 698.45 क्विंटल 44,457 रक्कम, शितोळे ट्रेडिंग कंपनी 23 शेतकरी 4,314 क्विंटल रक्कम 15,10,166 रुपये, मोरयाट्रेडिंग कंपनी 1105 क्विंटल रक्कम 37,047, हिंदराज ट्रेडिंग कंपनी 24 शेतकरी 4,353 क्विंटल रक्कम 15,23, 777 रुपये, राजलक्ष्मी ट्रेडिंग कंपनी चे 2 शेतकरी 310 क्विंटल 1,08,514 रुपये.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या