Wednesday, January 7, 2026
HomeनगरShrirampur : श्रीगोंद्यात गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले

Shrirampur : श्रीगोंद्यात गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले

अजित पवार गट आणि भाजपमध्ये बैठकांचा सिलसिला, मुलाखती || इच्छुकांची संख्या वाढली

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीचे पडघम शहरात वाजायला सुरुवात झाली असून, एका बाजूला गुलाबी थंडी वाढत असताना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार अजून कुठल्याही राजकीय पक्षाने जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये बैठकांचा सिलसिला आणि इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. महाविकास आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्याकडे असल्याने, ते म्हणतील ती दिशा महाविकास आघाडीची असणार आहे.

- Advertisement -

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत 11 प्रभागांमध्ये 22 नगरसेवक असणार आहेत. प्रभागनिहाय अनेक इच्छुक तयारी करत आहेत; काहींचा अजून पक्ष ठरायचा आहे. मात्र इच्छुकांची संख्या वाढत आहे. शेवटपर्यंत किती इच्छुक मैदानात उतरतील आणि कोणते पक्ष सक्षम उमेदवार रिंगणात उतरवतील, हा एक महत्त्वाचा विषय आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्याकडे आले आहे. त्यांच्या बंगल्यावर इच्छुक मुलाखती पार पडल्या. यात त्यांची सून गौरी भोस यांना नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवण्याचे जाहीर केले असले तरी, यंत्रणा जुळवताना भोस यांच्या शिवाय दुसरे नाव ऐनवेळेस पुढे येण्याची शक्यता आहे.

YouTube video player

भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या; त्यात अनेक नवे चेहरे समोर आले असले तरी, भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागात उमेदवार बदलण्याचे धाडस दाखवणे हा वेगळा मार्ग होऊ शकतो. काही माजी नगरसेवकांच्या घरातच उमेदवारी दिली जाऊ शकते. नव्या आणि जुन्याचा मेळ घालत भाजपला सर्वमान्य नगराध्यक्ष पदाचा चेहरा समोर आणावा लागणार आहे. आता अनेक इच्छुक असले तरी त्यापैकी सगळी तयारी करणारा उमेदवाराचे नाव समोर येईल. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे घनश्याम शेलार, राहुल जगताप आदी नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का, शिवसेना शिंदे गटाशी युती करून भाजप विरोधात पॅनल करण्याची शक्यता अधिक आहे.

याशिवाय, शिवसेनेत सध्या असलेले मनोहर पोटे यांच्या भोवती अजून सत्तेचे गणित फिरू शकतात, असेच अनेक जाणकारांचे मत आहे. पोटेची राजकीय तयारी पाहता, ते सर्व प्रभागात आपली यंत्रणा उभी करतील आणि नगराध्यक्ष पदासाठी पत्नी शुभांगी पोटे यांना तर स्वतः सोयीच्या प्रभागात उमेदवारी देतील. याशिवाय नंदकुमार ताडे यांच्या सह इतर प्रभागातही आपली यंत्रणा उभी करतील. यात भाजपचा उमेदवार कोण राहील यावर पोटे यांची गणित अवलंबून आहेत. मागील निवडणुकीचा अनुभव पाहता, अधिक नगरसेवक भाजपचे तर नगराध्यक्ष पोटे यांची पत्नी विजयी झाल्या होत्या; सध्या तरी पोटे केंद्रस्थानी आहेत.

महायुतीचे घटक पक्ष भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्थानिक नेत्यांमध्ये एकमेकांशी जमत नाहीत. महाविकास आघाडी नेतृत्व करायला ज्येष्ठ नेते आणि नव्या नेत्यांची फळी आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता, माळी-मराठा जातीय समीकरणे महत्वाची ठरतात; आता ही जातीय समीकरणे अधिक महत्वाची ठरणार आहेत.

राजकीय ढोल वाजत असले तरी शहराच्या नागरी समस्यांकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहेत. लाखो रुपये महिन्याला आरोग्यावर खर्च होतात, तरी शहरात घाणीचे साम्राज्य आहे. साफसफाई होत नाही. फवारणी झालेली अनेकांना आठवत नाही. भटके कुत्रे रोज जनतेला चावे घेत आहेत. भटक्या जनावरांच्या राड्यात दोन-चार वाहन चालक रोज जखमी होत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...