Friday, November 22, 2024
Homeक्राईमश्रीगोंदा परिसरात लुटमार करणारी आठ जणांची टोळी गजाआड

श्रीगोंदा परिसरात लुटमार करणारी आठ जणांची टोळी गजाआड

एलसीबीची कारवाई || साडेचार लाखांचा ऐवज जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

श्रीगोंदा परिसरात रस्ता आडवून जबरी चोरी करणार्‍या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून दोन लाखांची रोकड, तीन दुचाकी व इतर साहित्य असा चार लाख 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. किरण उत्तम लोंढे (वय 22, रा. महालक्ष्मी चौक, काष्टी, ता. श्रीगोंदा), ओम शांतराम धोत्रे (वय 24, रा. दत्तनगर, काष्टी), रोहित साहेबराव शिंदे (वय 20), किरण लक्ष्मण गायकवाड (वय 21, दोघे रा. बजरंगनगर, काष्टी), सुनील शिवाजी लोणारे (वय 21, रा. कायनेटीक चौक, केडगाव), राहुल उत्तम काळे (वय 19, रा. भिंगार), निखील अश्विन घोरपडे (वय 20, रा. माधवबाग, भिंगार), अक्षय अण्णासाहेब कोबरणे (वय 25, रा. दुधसागर सोसायटी, केडगाव) अशी पकडलेल्या आठ जणांची नावे आहेत.

- Advertisement -

अभय अमृतलाल मांडोत (वय 58, रा. जनता कॉलनी, दौंड, ता. दौंड, जि. पुणे) हे 24 ऑक्टोबर रोजी त्यांच्या टेम्पोमधून किराणा माल वेगवेगळ्या गावामध्ये विकून मालाचे पैसे घेऊन टाकळी लोणार (ता. श्रीगोंदा) येथून जात होते. त्यावेळी त्यांच्या टेम्पोला अनोळखी चार जणांनी अडवून त्यांना धारदार हत्याराने मारहाण करून तीन लाख 60 हजारांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिले होते. त्यासाठी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, फुरकान शेख, रवींद्र घुंगासे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, उमाकांत गावडे, हृदय घोडके, मेघराज कोल्हे यांचे पथक नियुक्त केले होते.

या पथकाने घटनाठिकाणी भेट देवून, तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीत संशयित आरोपींची माहिती घेतली असता सदरचा गुन्हा किरण उत्तम लोंढे याने त्याच्या साथीदारांसह केला असल्याची माहिती मिळाली. पथकाने किरण लोंढेसह आठ जणांना अहिल्यानगर ते काष्टी रस्त्यावरील पारगाव फाटा येथे सापळा लावून पकडले. त्यांच्याकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार अल्ताफ उर्फ अली नूरमोहंमद आतार (रा. भैरवनाथ चौक, काष्टी) व योगेश रमेश शिंदे (पत्ता नाही) यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

आणखी दोन गुन्ह्यांची कबुली
ताब्यात घेण्यात आलेला संशयित आरोपी किरण लोंढे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी गुन्हे केल्याची कबुली दिली. लोंढे याने त्याचे साथीदार सुनील शिवाजी लोणारे, अक्षय अण्णासाहेब कोबरणे, अल्ताफ उर्फ अली नूरमोहंमद आतार यांच्या मदतीने मार्च 2024 मध्ये काष्टी ते दौंड रस्त्यावरील चौधरी मळा येथे एका व्यक्तीला दुचाकीवर येत असताना त्यास अडवून पैसे चोरल्याची माहिती सांगितली. त्याने दिलेल्या माहितीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील जबरी चोरी व चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या