Thursday, May 30, 2024
Homeनाशिकशेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी - श्रीराम शेटे

शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी – श्रीराम शेटे

ओझे l विलास ढाकणे | Oze

कादवा सातत्याने ऊसाला (Sugar Cane) जिल्ह्यात सर्वाधिक भाव देत असून ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक आहे तरी शेतकऱ्यांनी (Farmers) एकरी उत्पादन वाढवत जास्तीत जास्त ऊस लागवड करत कादवाला ऊस पुरवठा करावा असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे (Shriram Shete) यांनी केले. कादवा सहकारी साखर कारखान्याचा (Kadwa Cooperative Sugar Factory) बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ कारखान्याचे सभासद खंडेराव फुगट (चिंचखेड) कृष्णा पाटील (मोहाडी) रमेश देशमुख (करंजवण), शेखर जाधव (वडनेर भै) राजेंद्र आहेर (वडाळीभोई) यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून चेअरमन श्रीराम शेटे बोलत होते…

- Advertisement -

मुंबई पोलीस ड्रग्ज माफिया ललित पाटीलला घेऊन नाशकात; कारखान्याच्या ठिकाणी केली चौकशी

पुढे बोलताना शेटे म्हणाले की, निसर्गाच्या (Nature) लहरीपणामुळे कधी पिकांचे नुकसान होत आहे तर कधी शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असताना ऊस पीक हे शाश्वत उत्पन्न देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालणे शक्य नाही. त्यामुळे काळाची पावले ओळखत कादवाने विस्तारीकरण करत इथेनॉल प्रकल्प सुरू केले आहे. पुरेसे ऊस तोडणी मजूर भरती करण्यात आली असून ऊस तोडणीचे योग्य नियोजन करण्यात येणार आहे. यंदा जास्तीत जास्त ऊस गाळप करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वांनी कादवाला ऊस पुरवठा करावा असे आवाहन शेटे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक सुकदेव जाधव यांनी केले. यावेळी विश्वासराव देशमुख व्हा.चेअरमन शिवाजी बस्ते,सर्व संचालक,दत्तात्रय जाधव,भास्कर भगरे, संजय पडोळ,विलास कड, प्रमोद अपसुंदे, पांडुरंग गडकरी, वसंतराव कावळे, त्र्यंबकराव संधान,जयराम डोखळे, भालचंद्र पाटील, वाळू जगताप, प्रकाश पिंगळ,रघुनाथ जाधव, प्रभाकर बाऱ्हाते, दिलीपराव शिंदे, गुलाब तात्या जाधव, बाबुराव डोखळे,रामभाऊ ढगे,अशोक भालेराव यांच्यासह पदाधिकारी सर्व अधिकारी कामगार ,सभासद सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दसऱ्याला ‘नासाका’चा बॉयलर पेटणार; २.५० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट – खासदार गोडसे

एकरी उत्पादन वाढल्यास पुरेसा ऊस

कादवाचे कार्यक्षेत्रात ४००० हेक्टर ऊस लागवड (Sugarcane Cultivation) आहे. परंतु, एकरी उत्पादन कमी होत आहे. काही शेतकरी एकरी १०० टनाचे वर उत्पादन घेत आहे. त्याचा आदर्श घेत शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने ठिबक सिंचन करत ऊस लागवड करून एकरी जास्त उत्पादन घ्यावे. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य मार्गदर्शन कारखाना करेल. एकरी उत्पादन वाढण्यास कार्यक्षेत्रातच पुरेसा ऊस उपलब्ध होणार आहे.

उपपदार्थ निर्मिती करावीच लागणार

साखरेला कमी भाव मिळत असल्याने साखरेत कारखाने तोट्यात जात असताना इथेनॉल व इतर उपपदार्थ निर्मितीमुळे कारखाने तग धरून आहे. केंद्र सरकारने इथेनॉलबाबत सकारात्मक निर्णय घेत रसापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली असून हायड्रोजन सिएनजीलाही प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे भविष्यात सर्व उपपदार्थ निर्मिती करावी लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांना जोड धंदा म्हणून डेअरी प्रकल्पही सुरू करण्याचा मानस असल्याचे श्रीराम शेटे यांनी सांगितले.

संस्थेच्या हितासाठी कादवालाच ऊस पुरवठा करा

कारखान्याचे जास्तीत जास्त गळीत होणे हे कारखाना सुरू राहण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. कार्यक्षेत्र व गेट केनचे ऊस तोडणीचे योग्य नियोजन करत कमी दिवसात जास्त गाळपाचे प्रयत्न असून एकाचवेळी सर्व ऊस तोड शक्य नाही. कादवा सातत्याने जिल्ह्यात सर्वाधिक भाव देत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी कारखान्याच्या हितासाठी कादवालाच ऊस पुरवठा करावा असे आवाहन चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Yeola News : मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील ६५ जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

- Advertisment -

ताज्या बातम्या