Sunday, May 11, 2025
Homeनगरश्रीरामपूर बाजार समिती व टाकळीभान उपआवारात मोकळा कांद्याची विक्रमी आवक

श्रीरामपूर बाजार समिती व टाकळीभान उपआवारात मोकळा कांद्याची विक्रमी आवक

माळवाडगाव / टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा मार्केट आवारासह टाकळीभान उपआवारात पंधरा दिवसांपासून प्रति क्विंटल ऩबर एक 1000 ते 1200 नंबर दोन 700 ते 950, असे भांव स्थिर आहेत. शेतकर्‍यांना उत्पादन खर्च पाहता हे भाव परवडणारे नसताना ‘गरजुवंताला अक्कल नसते’ या प्रचलित म्हणीप्रमाणे कांदा काढणी मजुरी अन् खरिपपूर्व शेत मशागतीसाठी नाईलाजाने शेतकरी पावसाळ्याच्या तोंडावर बाजारात कांदा विक्रीसाठी गर्दी करत असल्याने शुक्रवार दि.9 मे रोजी मुख्य आवारात 119 वाहनांची तर गोणी मार्केटला 5502 गोण्यांची आवक झाली तर टाकळीभान उपआवारात शनिवार दि.10 मे रोजी उच्चांक होऊन छोट्या मोठ्या वाहनांनी शंभरी गाठली.

- Advertisement -

नेहमीपेक्षा वाहनांची अचानक गर्दी होऊनही बाजार समितीने विक्री व्यवस्थेचे काटेकोरपणे नियोजन केल्याने वीनातक्रार लिलाव सुरळीतपणे पार पडले. श्रीरामपूर बाजार समिती मुख्य व उपआवारात आवक वाढल्यानंतर अथवा बाजारभाव पडल्यानंतर शेतकर्‍यांचे तक्रारीमुळे, व्यापारी शेतकरी बाजार समिती पदाधिकारी अधिकारी यांच्यात खडाजंगी पाहावयास मिळते. वेळप्रसंगी संतप्त शेतकरी लिलाव बंद पाडणे अथवा रास्तारोको आंदोलनाचा पवित्रा घेतात.गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समिती पदाधिकारी अधिकारी यांनी कांदा मार्केट व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी नियोजन केले आहे. शेतकर्‍यांचे क्षुल्लक तक्रारींचे देखील तातडीने निवारण केले जात असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना पाहावयास मिळत आहे. भुसार खरेदी विक्री मार्केटवर उलाढाल मंदावल्याने अन् कांदा मार्केटवर उलाढाल वाढू लागल्याने बाजार समितीस स्वत:चे (संस्थेचे) हित सांभाळून शेतकरी-व्यापारी यांच्याकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचे ठरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

श्रीरामपूर बाजार समितीच्या मुख्य व टाकळीभान उपआवारात बाजारभाव सारखेच असून, सर्व शेतकर्‍यांना कांदापट्टी दुपारपर्यंत रोख स्वरूपात हातात मिळते. टाकळीभान उपआवारात लिलाव सुरू होण्यापूर्वी बाजार समितीकडून ध्वनीक्षेपावर, शेतकर्‍यांना रोख स्वरूपात कांदापट्टी देणार्‍या व्यापार्‍यांनीच लिलावात बोली बोलावी असा वैधानिक इशारा देण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. श्रीरामपूरच्या दोन्ही आवारात निम्म्याहून अधिक कांदा वैजापूर-गंगापूरच्या गंगथडी भागातून येतो. गंगथडी भागातील शेतकर्‍यांना वाहतूक खर्चासाठी श्रीरामपूर बाजार परवडतो.

शेतावरील ठोक खरेदी मंदावली
गेल्या पंधरा वीस दिवसांपासून व्यापार्‍यांना जागेवर सरसकट नंबर एकचा कांदा सरसकट प्रति क्विंटल 800 ते 1000 भावाने मिळतो. 1100 ते 1200 वाहने जेमतेम असतात. वाहतूक काटा, हमाली हा सर्व खर्च शेतकर्‍यांचे माथी असल्याने व्यापारांर्‍यांच्या शेडमध्ये विना खर्ची माल येऊन पडत असल्याने शेतकर्‍यांचे बांधावरील ठोक मालाची खरेदी सध्या मंदावलेली आहे. व्यापारी पाठोपाठ ज्या शेतकर्‍यांकडे साठवण सुविधा, क्षमता आहे.अशा शेतकर्‍यांनी देखील बाजार समितीच्या आवारातून हा स्वस्तातील कांदा साठवण्यासाठी उचलण्यास सुरूवात केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या