Thursday, October 31, 2024
Homeनगरश्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 8 उमेदवारी अर्ज अवैध; 43 वैध

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 8 उमेदवारी अर्ज अवैध; 43 वैध

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

220 श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून 31 जणांनी 51 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल झालेल्या छाननीत 8 उमेदवारी अर्ज अवैध (बाद) ठरले. त्यामुळे आता 43 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. माघारीच्या शेवटच्या दिवशी किती उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेतात याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

अशोक निवृत्ती बागुल (राष्ट्रवादी एसपी), संतोष भाऊसाहेब कांबळे (शिवसेना), प्रशांत सदाशिव लोखंडे (शिवसेना), प्रशांत दत्तात्रय ओगले (भा.रा. काँग्रेस) यांचे एबी फॉर्म नसल्याने तर जितेंद्र अशोक तोरणे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), संजय विष्णू साठे (अपक्ष), सुरेश एकनाथ जगधने (अपक्ष) यांच्या अर्जातील माहिती अपूर्ण असल्यामुळे अर्ज अवैध ठरले.

तर संतोष भाऊसाहेब कांबळे (अपक्ष), अशोक बागुल (2 अपक्ष), शाम शंकर कानडे (अपक्ष), विश्वनाथ शंकर निर्वाण (अपक्ष), प्रशांत सदाशिव लोखंडे (अपक्ष), संदीप रमेश मगर (अपक्ष), चंद्रकांत संभाजी दोंदे (विकास इंडिया पार्टी), दिपक शत्रुमर्दन त्रिभुवन (अपक्ष), आप्पासाहेब आप्पाजी मोहन (वंचित बहुजन आघाडी), भाऊसाहेब शंकर पगारे (अपक्ष), जितेंद्र अशोक तोरणे (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष), अशोक मच्छिंद्र लोंढे (अपक्ष), हेमंत भुजंगराव ओगले (रा. काँग्रेस पक्ष), सिद्धार्थ दिपक बोधक (अपक्ष), सागर अशोक बेग (दोन अपक्ष), आकाश सुरेश शेंडे (बसपा), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना शिंदे गट), लहू नाथा कानडे (नॅशनल काँग्रेस पार्टी व अपक्ष), सदाशिव किसन लोखंडे (अपक्ष), संजय परसराम छत्तीसे (अपक्ष), सुभाष दादा त्रिभुवन (अपक्ष), अर्जुन सुदाम शेजवळ (अपक्ष), चेतना प्रवीण बनकर (अपक्ष), सुर्यकांत विश्वनाथ आंबेडकर (राष्ट्रीय समाज), राजेंद्र दत्तात्रय आव्हाड (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पक्ष), प्रकाश मार्शल संसारे (अपक्ष), राजू नाथा कापसे (मनसे), विजयराव गोविंदराव खाजेकर (अपक्ष) यांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या