श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
220 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सोमवार दि.28 ऑक्टोबर रोजी पाचव्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले, सागर बेग यांनी शक्तीप्रदर्शन करत आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यांच्यासह 12 उमेदवारांनी 14 नामनिर्देशनपत्र दाखल केले. पाचव्या दिवशी श्रीरामपूर मतदार संघासाठी 12 उमेदवारांची 14 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. तर 18 व्यक्तींनी 40 उमेदवारी अर्ज खरेदी केले. आजपर्यंत एकूण 91 व्यक्तींनी 186 उमेदवारी अर्ज नेले आहेत.
काल पाचव्या दिवशी हेमंत भुजंगराव ओगले (काँग्रेस), प्रशांत सदाशिव लोखंडे (2 अर्ज, शिवसेना व अपक्ष), सागर अशोक बेग (2 अर्ज, अपक्ष), सिध्दार्थ दीपक बोधक (अपक्ष), श्याम शंकरा कानडे (अपक्ष), विश्वनाथ शंकर निर्वाण (अपक्ष), संदीप रमेश मगर (अपक्ष), चंद्रकांत संभाजी दोंदे (विकास इंडीया पार्टी), दीपक त्रिभुवन (अपक्ष), आप्पासाहेब आप्पाजी मोहन (वंचित बहुजन आघाडी), भाऊसाहेब शंकर पगारे (अपक्ष), अशोक मच्छिंद्र लोंढे (अपक्ष) आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अण्णासाहेब अप्पाजी मोहन (1 अर्ज), नितीन नवनाथ उदमले (1 अर्ज), चंद्रकांत संभाजी दोंदे (2), लहु नाथा कानडे (अपक्ष 4), लहु नाथा कानडे (नॅशनलिस्ट काँग्रेस, 4 अर्ज), हेमंत भुजंगराव ओगले (2), भाऊसाहेब मल्हारी कांबळे (शिवसेना, 4), प्रशांत सदाशिव लोखंडे (भाजपा, 2), सदाशिव किसनराव लोखंडे (भाजपा, 2), ज्योती दीपक त्रिभुवन (2), प्रकाश मार्शल संसारे (4), मिलिंदकुमार मारुतीराव साळवे (2), प्रशांत दत्तात्रय ओगले (4), गणेश फकीरा शेवाळे (1), विशाल रमेश शिरसाठ (1), संजय फ्रान्सिस भोसले (2), सूर्यकांत आंबेडकर (1), भाऊसाहेब काशिनाथ देठे (1) आदींसह 18 व्यक्तींनी 40 उमेदवारी अर्ज खरेदी केले.