Thursday, September 19, 2024
Homeनगरश्रीरामपुरात सुमारे दोन टन गोमांस पकडले

श्रीरामपुरात सुमारे दोन टन गोमांस पकडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

शहरातील सुलताननगर परीसरातील वॉर्ड नंबर दोनमध्ये पोलिसांनी छापा टाकून सुमोर दोन टन गोमांस पकडले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवेज मुक्तार कुरेशी व फिरोज अब्दुलकरिम कुरेशी असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहे. शहरातील सुलताननगर परीसर वॉर्ड नंबर दोन येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जातीच्या जिवंत जनावराची कत्तल करुन त्यांचे मांस एका चारचाकी गाडीमध्ये भरत असून ते विक्री करण्याकरता घेवून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने पंच व पशु वैद्यकीय अधिकारी यांना सोबत घेवून छापा टाकण्यासाठी सदर ठिकाणी गेले असता. त्या ठिकाणी गोवंशीय जातीच्या जनावराचे कत्तल केलेले मांस हे एका मारुती इरटिगा गाडीत भरताना आवेज मुक्तार कुरेशी, (वय 26) व फिरोज अब्दुलकरिम कुरेशी (वय 39) रा. कुरेशी मोहल्ला, दिसले. त्यांना ताब्यात घेवून यावेळी सदर गाडीची व शेडची पंच व पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता गाडीमध्ये व पत्र्याच्या शेडमध्ये एक लाख 50 हजार रूपये किमतीचे अंदाजे 750 किलो गोवंशीय मांस इरटिगा कार क्रंमाक (एमएच.48 पी 5201) यामध्ये मिळून आले. तसेच 2 लाख 87 हजार रुपये किमतीचे अंदाजे 1435 किलो गोवंशीय जातीचे जनावरांचे मांस पत्र्याच्या शेडमध्ये मिळून आले असून सदर ठिकाणाहून पोलिसांनी एकूण 11 लाख 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आवेज मुक्तार कुरेशी, फिरोज अब्दुलकरिम कुरेशी यांच्या विरूध्द महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 चे सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (अ) (ब), (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग, डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, यांच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दिपक मेढे, हवालदार शफिक शेख, पोलीस नाईक आर. ओ. कारखेले, पोलीस नाईक भैरवनाथ अडागळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, कॉन्स्टेबल गौतम लगड, कॉन्स्टेबल संभाजी खरात, कॉन्स्टेबल अजित पटारे, कॉन्स्टेबल धंनजय वाघमारे, कॉन्स्टेबल अमोल गायकवाड कॉन्स्टेबल रामेश्वर तारडे यांनी केली. पुढील तपास पो.ना. भैरवनाथ अडागळे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या