टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan
विवाह समारंभ उरकून घराकडे परत येत असलेल्या बोलोरो जीपला दुचाकीस्वार आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बोलोरोवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला चिरडून बोलोरो लिंबाच्या झाडाला (Car Accident) आदळली. यामध्ये दुचाकीस्वारासह तीन ठार (Death) झाले. तर दोघांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने अहील्यानगर (Ahilyanagar) येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. ही घटना आज दि.21 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर (Shrirampur Newasa Road) टाकळीभान शिवारात घडली.
याबाबत माहिती अशी की, टाकळीभान येथील प्रगतशिल शेतकरी शिवाजीराव धुमाळ यांच्या मुलाचा विवाह प्रवरासंगम येथे आयोजित केला होता. विवाह सभारंभ आटोपुन घरी टाकळीभान येथे परतत आसताना, टाकळीभान-श्रीरामपूर राज्यामार्गार टाकळीभान शिवारातील स्वस्तीक ट्रेंडिंग दुकानासमोर दिगंबर पांडूरंग शिंदे (वय 65, रा- गुजरवाडी) टीव्हीएस मोपेड (नं. एमएच 17 डीबी 9707) हे अचानक बोलेरो (नं. एमएच 17 क्यु 1795) गाडी समोर आल्याने त्यांना वाचविताना चालकाचे वहानवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो बाजूच्या लिंबाच्या झाडाला घासल्याने बोलोरो जीपचा पत्रा उचकटुन अपघात (Accident) घडला. त्यामुळे बोलेरो गाडीत बसलेल्या धुमाळ यांच्या नातेवाईकांना जबर ईजा झाली. या अपघातात बोलेरो जीपचा चक्काचूर झाला आहे. तर मोपेडचेही मोठे नुकसान झाले आहे.
बोलेरोमध्ये एकूण आठजण प्रवास करत होते. वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात (Accident) झाल्याने तरुणांनी त्वरीत मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना बोलेरो जीप मधून बाहेर काढले व तातडीने श्रीरामपूर (Shrirampur) येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. उपचारा दरम्यान दुचाकीस्वार दिगंबर शिंदे यांचा मृत्यू झाला. तसेच बोलेरो मधील सातारा येथील नातेवाईक जाधवराव कुटुंबातील गोपिका दिलीपराव जाधवराव, देवयानी दिलीपराव जाधवराव या दोन महिलांचा उपचार सुरू असतांना मृत्यू (Death) झाला. तर इतर जखमींपैकी सुशील हरिश्चंद्र इंगळे (वय 63), दिलीप जाधवराव (वय 60) या दोघांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले असून उज्वला सुशील इंगळे (वय 61), जनार्दन जाधवराव (वय 60), प्रकाश हनुमंतराव धुमाळ (वय 60), सुप्रिया प्रकाश धुमाळ (वय 49) या जखमींवर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोलीस उप निरीक्षक मुरकुटे, सहाय्यक फौजदार रविंद्र पवार, पोलिसमित्र बाबा सय्यद हे घटनास्थळी पोहचले व अपघाताची माहिती घेतली.