Saturday, July 27, 2024
Homeनगरयोगी सरकार विरोधात आत्मक्लेश आंदोलन

योगी सरकार विरोधात आत्मक्लेश आंदोलन

श्रीरामपूर |वार्ताहर| Shrirampur

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीदिनी काँग्रेस पक्षाने राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधीना आदरांजली अर्पण केली.

- Advertisement -

पुष्पअर्पण केल्यानंतर देशातील सध्य स्थिती बद्दल चिंता व्यक्त केली. काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशातील भाजपाचे योगी सरकार व केंद्रातील मोदी सरकार त्यांचा निषेध करत आत्मक्लेश आंदोलन केले.

यावेळी आ. लहु कानडे, महासचिव करण ससाणे, जिल्हा काँगे्रसचे उपाध्यक्ष इंद्रभान थोरात पाटील, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, बाबासाहेब कोळसे, जि. प. सदस्य अशोक पवार, सतिश बोर्डे, मार्केट कमिटीचे संचालक सुधिर नवले, पं. स. सदस्या वंदना मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे सहसचिव सुभाष तोरणे, राजेद्र औताडे, विष्णूपंत खंडागळे, अ‍ॅड.सर्जेराव कापसे, मुरली राऊत, रमेश आव्हाड, सुरेश कदम, अनिल देसर्डा, रावसाहेब आव्हाड, शफी शहा, नधाज शेख, अविनाश काळे आदी उपस्थित होते.

यावेळी आ. कानडे म्हणाले, राष्ट्रपिताच्या जयंतीच्या दिवशी आदंराजली वाहताना मन वेदनाग्रस्त आहे. ज्या महापुरुषाने जगाला अहिंसा व सत्याग्रहाचा मार्ग दाखवला त्या महात्मा यांच्या विचारावर हाथरस येथील त्या पीडित ग्रस्त मुलीची जिभ छाटली गेली. त्या रक्ताचे शिंतोडे उडाले आहे.

आजचे आत्मक्लेश आंदोलन ते डाग धुऊन काढण्यासाठी आहे. नंतर केंद्राच्या हुकूमशाही मोदी सरकारने शेतक्यांना भांडवलदाराच्या दावणीला बांधणारे शेतकरी विरोधी कायदे सभागृहामध्ये दंडेलशाहीने मंजूर करून घेतले. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. तसेच काल उत्तरप्रदेश हाथरस येथील दलित पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँगे्रसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी जात असताना योगी सरकारच्या निदर्यी पोलिसांनी त्यांना धक्काबुकी केली. त्यांच्या ही आम्ही जाहीर निषेध करत आहे.

भाजपाच्या नरेंद्र मोदी त्यांच्या केंद्रातील सरकारने एका- पाठोपाठ एक लोकशाहीचे खून पाडणे सुरू केले आहे. तर उत्तर प्रदेशातील आदित्यनाथ योगीच्या मनोवादी सरकारने दलित शोषितांवर अत्याचाराचा कहर केला असून समाजातील बंधुत्व नष्ट केले आहे. यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. यांनतर हुतात्मा स्मारक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या