Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 11 जण करोनाबाधित

श्रीरामपूर तालुक्यात 11 जण करोनाबाधित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल एकूण 11 जण करोनाबाधित आढळून आले, त्यामुळे तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा 3132 वर जावून पोहचला आहे.

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यात काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 46 जणांची तपासणी करण्यात आली यात 07 जण पॉझिटीव्ह तर 39 जण निगेटीव्ह आढळून आले आहेत. रॅपीड टेस्ट मध्ये 7, जिल्हा रुग्णालयात 02, खासगीत-02 असे 11 जण पॉझिटीव्ह आढळून आले.

रॅपीड मधील पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये उक्कलगाव-01, गोंडेगाव़-02, भैरवनाथनगर-01, फरगडे वस्ती 2, हरेगाव-01 अशा 07 जणांचा समावेश आहे.

श्रीरामपुरातील सरकारी कोविड सेंटरमध्ये एकूण 22 रुग्ण उपचार घेत आहेत. 01 रुग्ण अन्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आला आहे. 5 जणांंना बरे वाटल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 6 जणांचे घशाचे स्त्राव घेण्यात आले असून यात चार जण शिक्षकेतर कर्मचारी आहेत. श्रीरामपूर तालुक्यात कालपर्यंत 1230 जणांची रॅपीड टेस्ट करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या