Tuesday, May 21, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 233 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 233 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात (Shrirampur Taluka) काल 45 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले आहेत. अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची (Active Patient)संख्या 233 वर जाऊन पोहोचली. हे सर्व रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 29 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

- Advertisement -

जिल्हा रुग्णालय- 02, खासगी रुग्णालयात 24 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 19 असे रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 16412 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 16225 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर शहरात 06 तर ग्रामीण भागात 32 व बाहेरील तालुक्यातील ज्यांचे नाव, फोन नंबर नाही-07 असे एकूण 45 रुग्ण आहेत. शहरी भागात वॉर्ड नं. 1-02, वॉर्ड नं. 2-01, वॉर्ड नं. 3-01, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-01 ग्रामीण भागात बेलापूर बुदुक-03, गळनिंब-01, पढेगाव-01, भेर्डापूर-08, उंबरगाव-02, वळदगाव-01, टाकळीभान-01, वांगी बुदुक-01, उंदिरगाव-01, ब्राम्हणगाव-01, दत्तनगर-01, शिरसगाव-02, गोंडेगाव-03, मुठेवाडगाव-01, निपाणीवडगाव-03, अशोकनगर-02, असे ग्रामीण भागात 32 तर अन्य तालुक्यातील 07 असे 39 रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या