Friday, June 21, 2024
HomeनगरCrime News : दत्तनगर येथे तरुणावर जीवघेणा हल्ला! भरदिवसा सपासप वार

Crime News : दत्तनगर येथे तरुणावर जीवघेणा हल्ला! भरदिवसा सपासप वार

टिळकनगर (वार्ताहर)

- Advertisement -

श्रीरामपूर शहराच्या लगद असणाऱ्या दत्तनगर गावात भरदिवसा एम.आय.डीसी मध्ये कामाच्या शोधात जात असलेल्या संपत ईले नावाच्या तरुणावर अज्ञात चार व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला करून वार केल्याची घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुरुवातीला संपत इले या तरुणास चौघे हल्लेखोरांनी भर दुपारी उचलून आपल्या दुचाकी वर बसवले जवळ असलेल्या रेल्वेच्या रुळाकडे नेऊन धारदार शास्त्राने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. रस्त्याने येणारे जाणारे जमा झाल्याने तसेच संपत ईले यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोरांनी लगेचच धूम ठोकली व या तरुणाचा सुदैवाने त्याचा जीव बचावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या