Tuesday, September 17, 2024
Homeनगरश्रीरामपुरात राडा; पाच जखमी, सात जणांविरुध्द गुन्हा

श्रीरामपुरात राडा; पाच जखमी, सात जणांविरुध्द गुन्हा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

झाडावरील पेरू का तोडला या कारणावरुन शहरातील मोरगेवस्ती परिसरात दोन गटात दगडफेक, चाकून वार केल्याची घटना घडली, याप्रकरणी सहा ते सात जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वॉर्ड नं 3 येथे राहणारे आशा उईके या त्यांच्या पुतण्यांसोबत रेशन घेऊन घरी परतत असताना, मोरगे वस्ती येथील गणपती मंदीर टॉवर रोड परिसरात पप्पू शेटे यांच्या घराजवळ रोडवर त्यांचा भाचा सत्या उईके याने खाली पडलेला पेरु खाण्यासाठी उचलला. परंतु अरफान शेख याने झाडावरून पेरू तोडला असा गैरसमज करुन सत्या यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा त्यांची पुतणी जयनी उईके हिने त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांचेे काही ऐकून न घेता हरभजन उईके यांस जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार करून पाठीवर खुपसला.

पुन्हा चाकु मारण्याचा प्रयत्न केला असता त्यास अ‍ॅन्थोनी उईके याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने चाकू अ‍ॅन्थोनी यांस हातावर लागून दुखापत झाली आहे. तसेच हुजैप शेख याने त्याच्याकडील लोखंडी रॉडने जयनी उईके, दिपीका उईके यांना डोक्यावर, कपाळावर मारून दुखापत केली. तसेच फिरोज फिटरवाला याच्यासोबत इतर 4 ते 5 अनोळखी साथीदारांनी सागर उईके यांस लााथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्याकडील दगड फेकून मारुन आशा उईके यांना त्यांच्या आदीवासी समाजावरुन जातीवाचक शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आशा अंजेश उईके यांनी श्रीरामपूर शर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अरफान शेख, हुजैप शेख, फिरोज फिटरवाला व इतर 4 ते 5 अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तापस पोलीस निरिक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या