Wednesday, January 7, 2026
HomeनगरCrime News : गोंधवणी रोडवर तरुणाकडून हवेत गोळीबार

Crime News : गोंधवणी रोडवर तरुणाकडून हवेत गोळीबार

श्रीरामपूर (प्रतिनिधी)

काल रात्री गोंधवणी रोडवर हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणास पकडून काहींनी चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांसमोर उभे केले. त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

- Advertisement -

शहरातील एका गँगचा कार्यकर्ता समजल्या जाणाऱ्या एका तरुणाने काल रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास गोंधवणी रोडवर जाऊन दुसऱ्या गँगच्या सरदाराच्या संपर्क कार्यालयासमोर जावून हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच तेथील काही तरुणांनी गोळीबार करणाऱ्या तरुणास पकडून चांगलाच चोप दिला.

YouTube video player

सदर घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या तरुणाला ताब्यात घेतले. त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही बाजुचा मोठा जमाव जमा झाला होता. आपणास गोंधवणी रोडच्या गँग सरदाराने कट्टा दाखवून धमकविल्याचा आरोप गोळीबार करणाऱ्या तरुणाने केला. तर दुसऱ्या बाजुने या तरुणानेच गावठी कट्टा दाखवून धमकविल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...