Friday, February 6, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरातील इराणी गल्लीत नशेच्या गोळ्या

Shrirampur : श्रीरामपुरातील इराणी गल्लीत नशेच्या गोळ्या

‘नायट्रोझेपम’ची 9 पाकिटांसह महिला ताब्यात

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील इराणी गल्ली येथे एका 24 वर्षीय महिलेस अवैधरित्या कोणतीही वैद्यकीय शिफारस नसताना नशेच्या नायट्रोझेपमच्या गुंगीकारक गोळ्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. झैनब जाफर इराणी (वय 24) असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून गोळ्यांचे 9 पाकिटे ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

शहरातील इराणी गल्ली, वॅार्ड नं 1 अवैधरित्या गुंगीकारक औषधी गोळ्यांची विक्री सुरू असून या गोळ्या नशा करण्यासाठी विक्री केल्या जात असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली. त्यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ. लोंढे, पोना दरंदले, पो. कॉ. बिरदवडे, पो कॉ. गाडे, पोलीस उपनिरीक्षक हंडाळ, सपोनि जाधव, पोलीस शिपाई फकीर, पोलीस हवालदार शेलार, पोना उदंरे व आरसीपी प्लाटूनच्या 3 महिला या पथकाने दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी इराणी गल्ली येथे सदर महिलेच्या घराची झडती घेतली.

YouTube video player

त्यावेळी या महिलेच्या घराच्या दरवाजाच्या बाजूस एका प्लॅस्टिकच्या पिशवीत औषधी गोळ्यांचे स्ट्रिप्स आढळून आले. या गोळ्याबाबत संबंधित महिलेकडे विचारणा केली असता त्या गुंगीकारक व झोपेच्या नायट्रोझेपमच्या असून विक्रीसाठी आणल्या असल्याचे सांगितले. या गोळ्या कोठून आल्या याबाबत पोलिसांना माहिती सांगण्यास सदर महिलेने नकार देऊन उडवा-उडवीची उत्तरे दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक बेबी आण्णा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन झैनब जाफर इराणी (रा. इराणी गल्ली, वॉर्ड नं 1, श्रीरामपूर) हिच्याविरूध्द भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125, 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सोनईला मोरे, आश्वीला शिरसाठ प्रभारी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील आश्वी, सोनई पोलीस ठाण्यासह साई मंदिर सुरक्षा, शिर्डीसाठी नवीन प्रभारी पोलीस अधिकारी देण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी...